esakal | जिल्ह्यातील एसटी आगारांना आली जाग
sakal

बोलून बातमी शोधा

The ST depots in the district woke up

""गाडी नंबर एमएच ... कोल्हापूर-पुणे मार्गावर धावणारी बस फलाट क्रमांक दोनवर लागली आहे, कोल्हापूर व्हाया कराड, सातारा, पुणे स्वारगेट शिवाजी नगर मार्गावर प्रवास करणाऱ्यांनी नोंद घ्यावी. गेली साडेचार महिने बंद राहिलेली ही उद्‌घोषणा आज मध्यवर्ती बसस्थानकावर घुमली.

जिल्ह्यातील एसटी आगारांना आली जाग

sakal_logo
By
शिवाजी यादव

कोल्हापूर  ः ""गाडी नंबर एमएच ... कोल्हापूर-पुणे मार्गावर धावणारी बस फलाट क्रमांक दोनवर लागली आहे, कोल्हापूर व्हाया कराड, सातारा, पुणे स्वारगेट शिवाजी नगर मार्गावर प्रवास करणाऱ्यांनी नोंद घ्यावी. गेली साडेचार महिने बंद राहिलेली ही उद्‌घोषणा आज मध्यवर्ती बसस्थानकावर घुमली. पंधरा-वीस प्रवाशी धावाधाव न करता कोल्हापूर-पुणे बसमधून मार्गस्थ झाले. जिल्हाभरात 28 लालापरीतून एक हजार 320 प्रवाशांनी प्रवास केला.

कोरोना संसर्ग टाळण्यासाठी गेली पाच महिने लॉकडाऊन काळात महामंडळाचा प्रवास बंद आहे. अशात स्थितीत अनेकजण आपल्या गावी तर काहीजण परजिल्ह्यातील, परराज्यातील गावी अडकून पडले. काहींना नोकरी व्यवसायाला परजिल्ह्यात जाणे मुश्‍कील झाले होते. जिल्हाभरातील रोजच्या 500 गाड्यांतून होणारी प्रवासी वाहतूक बंद राहिली. रोज दहा ते बारा लाखांचा महसूल बुडला आहे. अशात महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे पगर थकले. गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवरही एसटीचा आंतर-जिल्हा प्रवास सुरू झाला.

मध्यवर्ती बसस्थानकातून कोल्हापूर ते पुणे, सांगली, इस्लामपूर, सोलापूर या मार्गावर गाड्या सुटल्या. याशिवाय संभाजीनगर ते गडहिंग्लज, गारगोटी, कागल ते सातारा, कुरुंदवाड ते सांगली, इचलकरंजी ते मिरज सोलापूर, आजरा ते पुणे या मार्गावरील बस गाड्या सुरू झाल्या. बहुतेक गाड्यांतून कमीत कमी 10 ते 25 प्रवाशी होते. चालक-वाहकांनी प्रवाशांना मास्कची सक्ती केली आहे. तर बसगाडीही निर्जंतुकीकरण केल्या जात आहेत. 

दिवसभरात 60 फेऱ्या 
- एकूण प्रवासी 1 हजार 320 
0 एकूण बस गाड्या 28 
- 11 स्थानकातून गाड्या सुटल्या 
- कोल्हापूर-पुणे, सांगलीला प्रतिसाद 

कोरोनासंसर्ग टाळण्यासाठी शासकीय सूचनांचे पालन करून प्रवाशांना आंतर-जिल्हा प्रवास एसटीने करता येणार आहे. त्यासाठी जिल्ह्यातील आगारांतून बस सोडल्या आहेत. ज्या मार्गावर प्रवाशी जास्त असतील त्या मार्गावर प्राधान्याने बस सोडण्यात येत आहेत. 
- रोहन पलंगे, विभाग नियंत्रक 
 

संपादन ः रंगराव हिर्डेकर 

loading image
go to top