ST Strike - मुंबईसह कोल्हापुरात संपाचा पेच कायम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

st

दरम्यान या परिसरात पोलिस बंदोबस्त तैनात झाला आहे.

ST Strike - मुंबईसह कोल्हापुरात संपाचा पेच कायम

कोल्हापूर - राज्याती मगील एक महिना सुरु असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर बाबत अद्याप निर्णय झालेला नाही. आझाद मैदानावरील कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतला, तरच कोल्हापुरातील एसटी कर्मचारी संप मागे घेणार आहे. तत्पूर्वी कोल्हापूरच्या मध्यवर्ती बस स्थानकावर सर्व एसटी कर्मचारी जमा होत आहेत. दरम्यान या परिसरात पोलिस बंदोबस्त तैनात झाला आहे. एसटी प्रशासनाने प्रवासी वाहतुकीची तयारी केली आहे, मात्र प्रत्यक्ष एसटी प्रवासी वाहतूक सुरू झालेली नाही. या मुद्द्यावर काही वेळातच निर्णय होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा: जनता दलामुळेच 'मॅजिक फिगर' ओलांडली - सतेज पाटील

दरम्यान, एसटीचे राज्य शासनात विलिनीकरण करावे, या मागणीसाठी १७ दिवस एसटी कर्मचारी संप करीत आहे. त्यावर मुंबईत सह्याद्री अतिगृहावर एसटी कर्मचारी शिष्टमंडळासोबत परिवहन मंत्री अनिल परब यांनी चर्चा केली यात वेतन वाढ, एसटी कर्मचारयांना इनसेन्टीव्ह तसेच निलंबीतांना कामावर घेण्याचा असे निर्णय घेतले. त्याची माहिती येथील मध्यवर्ती बसस्थानकातील संपकरी कर्मचाऱ्यांना मिळाली. तेव्हा विलिनीकरणाची मागणी मान्य न झाल्याने कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली.

‘शासनाची वेतनवाढचा निर्णय हा एकतर्फी आहे, केवळ वेतनवाढ देऊन मूळ मागणीकडे शासनाने दुर्लक्ष केले आहे. इतके दिवस आम्ही आंदोलन करतोय, आमच्या वेदना शासनाने समजून घेतलेल्या नाहीत, अशा अनेक प्रतिक्रीया कर्मचारी देत होते, मात्र संप मागे घ्यावा, की नाही घ्यावा याबाबत कर्मचाऱ्यांचे एकमत झाले नाही मात्र विलिनीकरणाच्या मुद्याला बगल दिल्याबाबत बहुतेक कर्मचाऱ्यांनी नाराजी व संताप व्यक्त केला.

हेही वाचा: Smita Patil |स्मिता पाटील यांच्यावरील संकटाची अनु कपूर यांना होती कुणकुण

loading image
go to top