दरवाढीमुळे प्रवाशांना साध्या बसमधून प्रवास करण्यासाठी प्रतिसहाकिलोमीटर मागे ११ रुपये मोजावे लागणार आहेत.
कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (Maharashtra State Road Transport Corporation) बससह खासगी वाहनांचा प्रवास महागणार असून, सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे. विधानसभा निवडणुकांच्या आधीपासून प्रलंबित असलेल्या एसटी भाडेवाढीला मंजुरी देण्यात आली. एसटीचे तिकीट (ST Ticket) शनिवारपासून (ता.२५) १४.९५ टक्क्यांनी महागणार आहे.