प्रवीण देसाई
कोल्हापूर : सरकारला सर्वाधिक महसूल देणारा विभाग म्हणून नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाची ओळख आहे. यामध्ये शंभर टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्यात कोल्हापूर जिल्हा नेहमीच अग्रेसर राहिला आहे. गेल्या ११ महिन्यांत जिल्हा मुद्रांक शुल्क विभागाने ७८ हजार ३९९ दस्त नोंदणी करून ४५८ कोटी ५७ लाख ५४ हजार इतका महसूल गोळा केला आहे. हे प्रमाण ७१ टक्के इतके आहे. उर्वरित उद्दिष्ट ३१ मार्चपर्यंत करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.