'पार्टी लीडरांची' उडाली झोप ; गावागावांत आता सरपंचपदासाठी फिल्डिंग सुरु

start for sarpanch post in village level political leader face situation in kolhapur
start for sarpanch post in village level political leader face situation in kolhapur
Updated on

कोल्हापूर : जिल्ह्यातील 433 गावच्या सरपंच पदासाठी 9 फेब्रुवारील मतदान होत आहे. मात्र, ज्या-ज्या गावात दोन्ही पार्टीचे समान सदस्य विजयी झाले आहेत आणि एक अपक्ष उमेदवार विजयी झाला आहे. त्या ठिकाणी मोठी चुरस होणार आहे. सरंपच निवड अजून नऊ दिवसांवर आहे, मात्र 'पार्टी लीडरांची' आत्तापासूनच झोप उडाली आहे. प्रत्येकाला आपल्या पार्टीचा आणि पक्षाचे वर्चस्व ग्रामपंचायतींवर राखण्यासाठी जोरदार हालचाली सुरु झाल्या आहेत. 

जिल्ह्यात चुरेशीने निवडणूक झाले. आता आपपल्या गावातील सरपंच पद कोणाला मिळणार ही चर्चा सुरु झाली आहे. ज्या गावात समसमान उमदेवार विजयी झाल्या आहेत. त्या गावात आता कोण-कुठे जाईल, याची खात्री कोणीही देवू शकत नाही. प्रत्येकजण सरंपच पद मिळाले पाहिजे, अशा पवित्र्यात आहे. त्यामुळे संस्था-संस्था व पार्टीमध्ये लाथाळी उसळण्याची शक्‍यता आहे. यंदाच्या निवडणूकीत 433 गावामध्ये एक-एका प्रभागात ज्या ठिकाणी 3 सदस्य निवडूण द्यायचे आहे. त्याठिकाणी ग्रामपंचायती 10 ते 12 उमेदवार निवडणूक रिंगणात होते. त्यामुळे निवडूण आल्यानंतर मी तुमच्या सोबतच आहे असा शब्द दिलेल्यांची मोठी गोची झाली आहे. 

एका पार्टीतून निवडणूक आणि दुसऱ्या पार्टीला शब्द देवून निवडणूक लढवणाऱ्यांना आता इकडे आड तिकडे विहिर झाली आहे. याशिवाय, अनेक गावांमध्ये पार्टी पातळीवर निवडणूक लढवली असली तरीही आता ती पक्षीय पातळीवर गेली आहे. कोण महाविकास आघाडीची सत्ता आणण्याच्या तयारीत आहे. कोण कॉंग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप तसेच इतर पक्षांची सत्ता आणण्याच्या प्रयत्नात आहेत. दरम्यान, 9 फेब्रुवारीलाच कोण-कोण सरपंच होणार हे स्पष्ट होणार आहे.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com