
कोल्हापूर : शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेली कर्जमाफी आणि लाडक्या बहिणींना २१०० रुपये देण्याबाबत अर्थ संकल्पात तरतूद नसल्याने जिल्ह्यातील शेतकरी व महिलांचा अपेक्षाभंग झाला आहे. साखर उद्योगही दुर्लक्षित राहिला असून अंबाबाई मंदिर, प्राधिकरणासह महापालिकेसाठी विशेष आर्थिक तरतूद केलेली नाही. त्यामुळे यंदाच्या राज्याच्या अर्थसंकल्पात कोल्हापूरला ठेंगा दाखवत आहे.