esakal | कर्नाटकातील मराठा समाजाची मागणी आयोगाने फेटाळली
sakal

बोलून बातमी शोधा

कर्नाटकातील मराठा समाजाची मागणी आयोगाने फेटाळली

कर्नाटकातील मराठा समाजाची मागणी आयोगाने फेटाळली

sakal_logo
By
विनायक जाधव

बेळगाव : कर्नाटकात मराठा समाजाला इतर मागास वर्ग '३ बी' प्रवर्गातून '२ ए' प्रवर्गात समाविष्ट करावे, अशी कर्नाटक क्षत्रिय मराठा परिषदेने केलेली मागणी कर्नाटक राज्य इतर मागासवर्ग आयोगाने फेटाळली आहे.

बंगळूर येथील कर्नाटक क्षत्रिय मराठा परिषदचे अध्यक्ष सुरेश साठे यांनी राज्य इतर मागास वर्ग आयोगाकडे याबाबतचे निवेदन पाठविले होते. त्यावर आयोगाने साठे यांना पत्र पाठविले असून यात ही मागणी फेटाळण्यात आली आहे. साठे यांनी १७ जून २०१९ रोजी आयोगाला कर्नाटकातील मराठा समाजाला प्रवर्ग '३बी' मधून '२ ए' मध्ये समाविष्ट करण्याची विनंती केली होती. त्यास आयोगाने नुकतेच पत्राद्वारे उत्तर पाठविले असून यात, राज्य इतर मागास वर्ग आयोगाचे मागील अध्यक्ष शंकरप्पा यांच्या नेतृत्वाखाली आयोगाने मराठा समाजाला २ ए मध्ये समाविष्ट करण्यासंबंधीचे आठ सल्ले आणि सूचना असलेला अहवाल २०१२ साली कर्नाटक सरकारला पाठविला आहे. पण त्यावर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. आयोगाकडून अधिनियम १९९५ अनुसार पुन्हा त्याच मागणीवरील अर्जाची पुनर्रपडताळणी करता येत नसल्याचे कारण देत हा अर्ज फेटाळण्यात आला असल्याचे म्हटले आहे.

हेही वाचा: अखेर मुंबई-गोवा महामार्गावरील वाशीष्टी पुलावरील वाहतूक सुरू

महाराष्ट्र बरोबरच कर्नाटकातही मराठा आरक्षणासाठी मूक मोर्चा काढण्यासह आंदोलन करण्यात आले होते. सध्या कर्नाटकात मराठा समाज हा ओबीसी ३बी मध्ये समाविष्ट आहे..कर्नाटकातील मराठा समाज हा मागासलेला असल्यामुळे समाजाला २ए मध्ये समाविष्ट करावे, अशी मागणी मराठा समाजाकडून केली जात आहे. कर्नाटकात राजकीय शैक्षणिक आणि आर्थिक दृष्ट्या मराठा समाज मागासलेला आहे. मराठा समाजाला कर्नाटकात २ए मध्ये स्थान मिळावे. यासाठी कर्नाटक क्षत्रिय मराठा परिषदेकडून शासनाकडे पाठपुरावा केला जात आहे.

loading image
go to top