
संदीप खांडेकर
कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या निवडणुकीच्या दोन तारखा जाहीर झाल्याने परिषदेत फूट पडल्याचे चित्र निर्माण झाले आहे. या तारखांमुळे परिषदेशी संलग्न जिल्हा संघटनांत संभ्रमावस्था निर्माण झाली असून, परिषदेचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार की, सरचिटणीस बाळासाहेब लांडगे यांच्या बाजूने उभे राहायचे, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.