तातडीने कृषी अधिकाऱ्यांनी बॅगांची विक्री बंद आदेश देऊन खताचे नमुने तपासणीसाठी ताब्यात घेतले. ७७ बॅगाही ताब्यात घेतल्या.
कुडित्रे : करवीर तालुक्यातील खुपिरे येथे बनावट रासायनिक खतांचा साठा (Chemical Fertilizers) आढळून आल्याने कृषी क्षेत्रात (Agriculture Department) खळबळ उडाली. रंकभैरवी या शेतीसेवा दुकानात १०:२६:२६ (एनपीके) या रासायनिक खताच्या ७७ बॅगा, बनावट खतांच्या बॅगा आढळून आल्या. कृषी दुकानदार आकाश गणपती नाळे (रा. सांगरूळ) याच्यावर करवीर पोलिसांत अत्यावश्यक सेवा कायदा, खते नियंत्रण कायदा व रासायनिक खते कायदा, असे तीन गुन्हे दाखल झाले आहेत.