Stray cattle spotted on a busy highway
sakal
कोल्हापूर
Kolhapur Stray Cattle : मोकाट जनावरांमुळे होणाऱ्या अपघातांसाठी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ‘गस्ती पथके’
Accidents on Highways : कोल्हापूरसह राज्यातील अनेक महामार्गांवर मोकाट जनावरांमुळे वाढणाऱ्या अपघातांची गंभीर दखल सर्वोच्च न्यायालयाने घेतली आहे. जीवितहानी आणि जखमींच्या वाढत्या घटनांमुळे प्रशासन सतर्क झाले
कोल्हापूर : मोकाट जनावरांमुळे महामार्गावर होणाऱ्या अपघातांची दखल घेऊन सर्वोच्च न्यायालयाने जिल्हा रस्ता सुरक्षा समितीला उपाययोजना करण्याबाबत आदेश दिले आहेत. त्यानुसार राज्य सरकारने समितीने विशेष मोहीम घेऊन महामार्गांवरील धोकादायक भागांची निश्चिती करावी, गस्ती पथकांद्वारे वारंवार पाहणी करून मोकाट जनावरांना ताब्यात घेऊन त्यांना तातडीने निवारा केंद्रात स्थलांतरित करावे, असे निर्देश दिले आहेत. पुढील आठवड्यात याबाबत जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होऊन कार्यवाहीला सुरुवात होण्याची शक्यता आहे.

