esakal | Corona Impact: खाद्य पदार्थांच्या हातगाड्यांवर शुकशुकाट
sakal

बोलून बातमी शोधा

Corona Impact: खाद्य पदार्थांच्या हातगाड्यांवर शुकशुकाट

Corona Impact: खाद्य पदार्थांच्या हातगाड्यांवर शुकशुकाट

sakal_logo
By
शिवाजी यादव

कोल्हापूर : कोरोनासंसर्ग टाळण्यासाठी संचारबंदी लागू झाली, शहरात गर्दीने भरून वाहणाऱ्यां बहुतांशी खाद्य पदार्थांच्या हातगाड्यांवर शुकशुकट पसरला. जवळपास दररोजच्या अंदाजे 35 लाखाच्या उलाढालीला खीळ बसली. हातावरील पोट परस्पर थांबले, या उलट अलिशान हॉटेल, मिठाई दुकाने सताड उघडी आहेत. असे परस्पर विरोधी चित्र शहरात आहे. यातून श्रमिकांच्या खिशाला सहज परवडणारे खाद्य पदार्थ मिळणे दुरापास्त झाले तर घर बसल्या खाद्यपदार्थांच्या मेजवाणीची पार्सल सेवा खुली आहे. यात नेमके जीवनावश्‍यकतेची व्याख्याच बदलल्याचे दिसत आहे.

संचारबंदीच्या काळात जीवनावश्‍यक बाबी सुरू ठेवण्याची सवलत आहे. त्यानुसार शहरातील हॉटेलमध्ये पार्सल सेवा सुरू आहे. खाद्यपदार्थांच्या गाड्या बंद ठेवण्याच्या सुचना नाहीत. येथे पार्सल सेवा देता येते तरीही संचार बंदीमुळे ग्राहक येणार नाहीत. अशा परस्पर गैरसमजातून अनेकांनी हात गाड्यावरील खाद्य सेवा बंद ठेवली. यातून श्रमिकांच्या खिशाला परवडणार घास अडखळला आहे. शहरात जवळपास दोन हजारांवर अधिक खाद्यपदार्थांचे हातगाडे आहेत. यातील बहुतेक सर्व गाड्या बंद आहेत. नोकरी, व्यवसाय, शिक्षण किंवा बेरोजगारी अनुभवणाऱ्या बहुतांशी वर्गासाठी रस्त्यावरील हातगाड्यावरील खाद्यपदार्थ हेच खिशाचा तोल संभाळून पोटाला आधार देण्यासाठी उपयुक्त ठरतो.

संचारबंदी काळात रोजगार नाही. पॉकेट मनी कमी झाल्याने रोजगार जाण्याची चिंता मोठी आहे, अशा विचित्र कचाट्यात असणारा श्रमिक वर्गही मोठा आहे. त्यांच्यासाठी हातगाडीवरील पदार्थ मिळणेही दुरापास्त झाले. त्यामुळे दोन वेळच्या जेवणाच्या खर्चात एक वेळच्या नाष्ट्याचे पार्सल आणणेही न परवडणारे नाही. हे वास्तव आहे. अशा स्थिती हॉटेलची पार्सल सेवा थोड्या उंची वर्गाला घेता येणे शक्‍य आहे. मात्र श्रमिकांना दोन वेळेची शुधाशांती घडवणारे स्वस्तातील खाद्य पदार्थ सहज मिळत नाहीत. अशी कोंडी झाली आहे.

गर्दी न करता संसर्ग टाळण्याची खबरदारी घेत हॉटेल व्यवसायातील पार्सल सेवा चालु शकते. त्याच धर्तीवर खाद्य पदार्थांच्या गाड्याही पार्सल सेवा चालवता येते. मात्र बसस्थानक, रेल्वे स्टेशन, मार्केट यार्ड, लक्ष्मीपुरी बाजार, भवानी मंडप, दवाखान्यांचे परिसर येथील हातगाड्या बहुतांशी बंदच आहेत. खाद्य गल्ल्यातील शुकशुकाट आहे. वास्तवीक जिल्हा प्रशासनाने या गाड्या बंद ठेवण्याचे आदेश दिलेले नाहीत पण संचार बंदीमुळे ग्राहक येणार नाहीत अशा परस्पर समजातून बंद असलेले हे व्यवसाय पोटाची चिंता वाढवत आहे.

एका हातगाडीवर कमीत कमी 500 रूपये तर 5000 हजारांची उलाढाल होते. दोन हजारांवर गाड्या बंद राहिल्या रोजचा 10 लाख ते 35 लाखांची उलाढाल थांबली, दिड लाखाहून अधिक लोकांची नाष्ट्याची गैरसोय सोसावी लागली. कमीत कमी 5 हजार लोकांचा रोजगार हिरावला आहे.