
New Rules For Pat Sanstha : संजय पाटील : पतसंस्थांसाठी २९ जुलै २०२५ च्या परिपत्रकान्वये सहकार आयुक्त कार्यालयाने पुन्हा आदर्श पोटनियम लागू केले आहेत. पतसंस्थांवर सहकार खात्याने कडक निर्बंध लादले असल्याच्या प्रतिक्रिया पतसंस्थेच्या पदाधिकाऱ्यांतून व्यक्त होत आहेत. सहकार आयुक्त यांनी राज्यातील ग्रामीण आणि बिगर शेती सहकारी पतसंस्थांना नवीन आदर्श पोटनियम लागू करण्याबाबत सुचविले आहे. संस्थांनी वार्षिक अथवा विशेष सर्वसाधारण सभेत हे पोटनियम लागू करून घेणे सहकार खात्याने सक्तीचे केले आहे.