esakal | निपाणीत काळा दिनी कडकडीत बंद ; बाजारपेठेत शुकशुकाट
sakal

बोलून बातमी शोधा

Strictly closed on Nipani Black Day Dryness in the market: Protest against tasmac in Karnataka

शहरात बंदला प्रतिसाद मिळाल्याने ठिकठिकाणी सीमाप्रश्‍नी लढ्याची चर्चा सुरु होती.

कर्नाटकात डांबल्याचा निषेध

निपाणीत काळा दिनी कडकडीत बंद ; बाजारपेठेत शुकशुकाट

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

निपाणी : काळा दिनी शहर व परिसरातील मराठी भाषिकांनी रविवारी (ता. 1) हरताळ पाळून अन्यायाने कर्नाटकात डांबल्याचा निषेध नोंदविला. बंदनिमित्त बाजारपेठेतील सर्व व्यवहार बंद ठेवून महाराष्ट्रात जाण्याची तीव्र इच्छा शहरवासीयांनी व्यक्त केली. शहरातील संवेदनशील परिसरात पोलिसांनी कडक बंदोबस्त तैनात केला होता.


भाषावर प्रांतरचनेवेळी मराठी बहुभाषिक सीमाभाग लोकेच्छेच्या विरोधात कर्नाटकात डांबला आहे. तेंव्हापासून आज अखेर निपाणीसह सीमाभागात काळादिन  पाळून मराठी भाषिक लोक आपले सर्व व्यवहार बंद ठेवतात. निपाणी शहर व परिसरातही हा दिवस निपाणी भाग महाराष्ट्र एकीकरण समिती, शिवसेनेसह मराठी भाषिकांकडून काळा दिवस म्हणून गांभीर्याने पाळला जातो.


आज (ता. 1) सकाळपासूनच शहरातील सर्व व्यवहार बंद होते. बाजारपेठेत सर्वत्र शुकशुकाट होता.धर्मवीर संभाजीराजेचौक, साखरवाडी, बसवेश्‍वरचौक, कित्तूर चन्नम्माचौक, कोठीवाले कॉर्नर, गुरुवारपेठ, दलालपेठ, शिवाजीचौक, बॅ. नाथ पै. चौक, शिवाजीनगर, मंगळवारपेठ आदी संवेदनशील परिसरात पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता. अत्यावश्‍यक सोयी-सुविधा वगळता शहरातील सर्व व्यवहार बंद होते. बंदची माहिती निपाणीसह भागात पसरल्याने ग्रामीण लोकांचा शहराकडे ओढा अल्प होता. शिवाय बाजारानिमित्त नजीकच्या महाराष्ट्रातून येणाऱ्या नागरिकांची वर्दळ कमी होती.

हेही वाचा- आता लाचेतील मोठ्या माशांवर डोळा -

हरताळ यशस्वी
हरताळानिमित्त बंदचे आवाहन करण्यात आले होते. दरवर्षी निपाणीत बंदला उस्फूर्त प्रतिसाद लाभतो. यंदाही कडकडीत बंद पाळल्याने हरताळ कार्यक्रम यशस्वी झाल्याची चर्चा चौका-चौकात, विविध सार्वजनिक ठिकाणी होती.

सीमालढ्याची चर्चा
शहरात बंदला प्रतिसाद मिळाल्याने ठिकठिकाणी सीमाप्रश्‍नी लढ्याची चर्चा सुरु होती. सीमाप्रश्‍नी लढ्यात निपाणीकर प्रारंभीपासून सक्रीय आहेत. सीमाप्रश्‍नी निपाणीत महाराष्ट्रातील अनेक दिग्गजांची भाषणे झाली आहेत. अनेक पिढ्यानंतरही व प्रशासनाच्या दडपशाहीला न जुमानता प्रश्‍नाबद्दल, अस्मितेबद्दलची तीव्रता कायम ठेवल्याने मराठी भाषिकांच्या एकीची व जिद्दीची चर्चा सुरु होती.

संपादन - अर्चना बनगे

loading image
go to top