esakal | तीन खासगी बसेसमधून ते 97 विद्यार्थी बेळगावात झाले दाखल...
sakal

बोलून बातमी शोधा

 students arrived in Belgaum by private buses from gujrat

गुजरात येथे शिक्षणानिमीत्त अडकुन पडलेले 97 विद्यार्थी बेळगावात परतले असून त्यांची वैद्यकीय चाचणी करून त्यांना होम क्वॉरंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे.

तीन खासगी बसेसमधून ते 97 विद्यार्थी बेळगावात झाले दाखल...

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

बेळगाव - जिल्ह्यात क्वारंटाईनमधून शनिवारी (ता. 2) 109 जणांची मुक्तता करण्यात आली आहे. त्यामध्ये बेळगाव, बेळगुंदी, हिरेबागेवाडीतील लोकांचा समावेश आहे.
दरम्यान, गुजरातमध्ये अडकलेले 97 विद्यार्थी देखिल सुखरुप बेळगावात परतले आहेत.

कोरोनाग्रस्तांच्या संपर्कात आलेल्या कुटुंबांना शहरातील विविध लॉकमध्ये 14 दिवसांसाठी इन्स्टिट्यूशनल क्वॉरंटाईन करण्यात आले होते. या सर्वांची दोन वेळा चाचणी घेण्यात आल्यानंतर सर्वांचे तपासणी अहवाल निगेटीव्ह आला होता. तसेच 14 दिवसांचे क्वॉरंटाईन पूर्ण झाल्याने या सर्वांची मुक्तता करण्यात आली आहे. मात्र मुक्तता करण्यात आलेल्यांना पुढील 14 दिवस आपल्या घरातच होम कॉरंटाईनमध्ये घरातच राहावे लागणार आहे. तसेच या सर्वांची वेळोवेळी आरोग्याधिकाऱ्यांकडून तपासणी केली जाणार असून त्यांच्यावर निगा देखिल ठेवली जाणार आहे. आज (ता. 2) डॉ. शशिधर नाडगौडा यांनी या सर्वांना मार्गदर्शन करून पुढे आवश्‍यक असलेल्या खबरदारीची सुचना करून पाठविले.

वाचा - जोतिबा डोंगरावर यंदा वावर जत्रेच्या जोड्या आल्याच नाहित                             

दरम्यान, गुजरात येथे शिक्षणानिमीत्त अडकुन पडलेले 97 विद्यार्थी बेळगावात परतले असून त्यांची वैद्यकीय चाचणी करून त्यांना होम क्वॉरंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे. चार दिवसापूर्वी राज्यपाल वजुभाईवाला यांच्या सुचनेनुसार गुजरातमधील विद्यार्थ्यांना कर्नाटकातून अहमदाबादला पाठविण्याची व्यवस्था करण्यात आली होती. यासाठी परिवहनमंडळाकडून विशेष बसेसची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र गुजरात सरकारने गुजरातमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांसाठी अशी व्यवस्था केली नव्हती. पण, या विद्यार्थ्यांना खासगी बसने घरी परतण्याची मुभा देण्यात आली होती. त्यानुसार काल (ता. 1) तीन खासगी बसेसमधून 97 विद्यार्थी बेळगावात दाखल झाले आहेत.

loading image
go to top