
कोल्हापूर : मेस (खानावळ) चालवून घर-संसार सांभाळत तिन्ही मुलांच्या शिक्षणाचा खर्च पेलणाऱ्या आई-वडिलांच्या कष्टाची झालर आज शिवाजी विद्यापीठाचे राष्ट्रपती सुवर्णपदक मिळविणाऱ्या बंडू कोळी याच्या यशाला लागली आहे. गुणवत्तेच्या जोरावर शिक्षण घेत त्याची यशस्वी वाटचाल सुरू आहे.