मुख्यमंत्री ठाकरे सर्वोत्कृष्ट ठरल्याचे देवेंद्र फडणवीस यांना आवडले नाही ....

Such criticism was made by Rural Development Minister Hasan Mushrif
Such criticism was made by Rural Development Minister Hasan Mushrif
Updated on

कोल्हापूर : अलीकडेच प्रसारमाध्यमांनी केलेल्या चाचण्यानुसार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देशातील सर्वोत्कृष्ट पाच मुख्यमंत्र्यांपैकी एक आहेत. नेमकी हीच गोष्ट माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना खटकलेली दिसतेय, अशी टीका ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली आहे. 


मी काही दिवसांपूर्वी माझे मित्र व राज्याचे विरोधी पक्षनेते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना "मौनम्‌ सर्वार्थ साधनम्‌', "मौन व्रतामुळे शांती लाभते' आणि "प्रतिकूल परिस्थितीत अध्यात्म हाच उपाय' अशी तीन महत्त्वाची पुस्तके वाचण्याचा सल्ला दिला होता. त्यांनी ती पुस्तके काही वाचलेली दिसत नाहीत, त्यांनी माझा सल्ला धुडकावून लावलेला दिसतोय, असेही श्री. मुश्रीफ यांनी पत्रकात म्हटले आहे. 

कोकणात जे निसर्ग चक्रीवादळामुळे नुकसान झालेलं आहे, त्यासाठी शंभर कोटी रुपयांची मदत अतिशय तोकडी आहे आणि राज्य सरकारची अवस्था पॉलिसी पॅरालिसीस नाही तर "ऍक्‍शन' पॅरालीसीससुद्धा आहे, अशा प्रकारची टीका केलेली आहे. वास्तविक पंचनामे झाल्याशिवाय अशी मदत देता येत नसते. परंतु विजेचे ट्रान्सफार्मर आणि जनतेच्या अत्यावश्‍यक सेवांसाठी तात्काळ मदत म्हणून शंभर कोटी रुपये जाहीर केल्याचे मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले होते. तसेच तातडीने पंचनामे करू आणि जेवढे नुकसान झाले असेल तेवढे सर्वच्या सर्व नुकसान सरकार देण्याचा प्रयत्न करेल, असेही जाहीर केले होते. असे असताना श्री. फडणवीस अशा प्रकारची वक्तव्ये आणि टीका करीत आहेत, हे निश्‍चितच हास्यास्पद आहे. 

जगातील दोनशेहून अधिक राष्ट्रीय कोरोना संसर्गाची संघर्ष करीत ज्या पद्धतीने महाराष्ट्रात कोरोनाचे हे संकट नियंत्रणात आणले आहे. त्यासह गेल्या सहा महिन्यातील कामाबद्दल प्रसारमाध्यमांनी केलेल्या चाचण्यातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देशातील सर्वोत्कृष्ट पाच मुख्यमंत्र्यांनी पैकी एक आहेत, असा गौरव केलेला आहे. ज्या -ज्या वेळेला कोरोना संसर्गाचे रुग्ण कमी होतात किंवा मृत्यूचा आकडासुद्धा कमी असतो. त्यावेळी श्री फडणवीस हे उसळून उठतात आणि या आकडेवारीमध्ये लपवाछपवी असल्याचा आरोप करतात, असेही पत्रकात म्हटले आहे. 

लस आली तर काय म्हणतील 

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ही लस येणार असल्याचे जाहीर केले आहे. ही लस आली आणि कोरोना नाश झाला तर श्री. फडणवीस काय म्हणतील? याबद्दल आजही माझ्या मनामध्ये विचार येतात आणि मला त्यांच्याबद्दल हसू येते. मी दिलेला सल्ला ऐकल्यास ते वैफल्यग्रस्त मनस्थितीतून बाहेर येऊन, त्यांचे मनस्वास्थ्य ठीक राहील, असे शेवटी पत्रकात म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com