esakal | जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या गोकुळची सुनावणी रद्द

बोलून बातमी शोधा

null

जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या गोकुळची सुनावणी रद्द

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

कोल्हापूर : जिल्ह्याच्या राजकीय पटलाचे लक्ष लागून राहिलेल्या गोकुळ निवडणुकीची सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी लांबणीवर पडली आहे.सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी होणार होती. यामुळेच सगळ्यांचे लक्ष या सुनावणीवर लागून राहिले होते.मात्र आज सुनावणी झालीच नाही.

काय आहे कारण निवडणूक पुढे ढकलण्याचे

गोकुळच्या निवडणुकीसाठी दोन मे रोजी मतदान होत आहे. मतदानासाठी जी प्रशासकीय तयारी पूर्ण झाली आहे दोन्ही बाजूकडून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी सुरू आहेत. तथापि कोरोणाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन राज्य शासनाने राज्यातील इतर सहकारी संस्थांच्या निवडणुका ऑगस्ट महिन्यापर्यंत पूर्ण केल्यात त्याच धर्तीवर गोकुळची निवडणूक पुढे ढकलावी अशी मागणी करणारी याचिका दोन संस्थांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती.

हेही वाचा- चंद्रकांत पाटील तुम्ही अब्रुनुकसानीचा दावा दाखल कराच; हसन मुश्रीफ यांचे आव्हान

यावर न्यायालयाने राज्य शासनाला 26 एप्रिल पूर्वी मान्यता सादर करण्याचे आदेश दिले होते त्यावरील सुनावणी आज होती. तथापि सर्वोच्च न्यायालयातील एका न्यायाधीशांचे निधन झाल्याने गोकुळच्या सुनावणी झाली नाही.

Edited By- Archana Banage