Kolhapur : शहरासह परिसरात वळवाची हजेरी; वातावरणात काहीसा गारवा निर्माण

संध्याकाळी पाचनंतर उकाडा काहीसा कमी झाला. सातनंतर ढगांचा गडगडाट सुरू झाला. विजाही चमकल्या आणि शहरासह उपनगरांतही वळीव बरसला. गेल्या चार दिवसांपासून हुलकावणी दिलेल्या वळवाने हजेरी लावली. त्यामुळे वातावरणात काहीसा गारवा निर्माण झाला.
Light rain graces city and surrounding areas, bringing temporary relief and a refreshing atmosphere.
Light rain graces city and surrounding areas, bringing temporary relief and a refreshing atmosphere.Sakal
Updated on

कोल्हापूर : उकाड्याने हैराण शहरवासीयांना मंगळवारी सायंकाळी वळवाच्या पावसाने काहीसा दिलासा मिळाला. शहर आणि उपनगर परिसरात सातच्यादरम्यान वळवाच्या सरी बरसल्या. उन्हाळ्यात तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत आहे. सकाळी काहीसा गारवा, दुपारी कडक ऊन असे वातावरण सध्या अनुभवायला येत आहे. आज दुपारीही तापमान ३८ अंशांपर्यंत पोहोचले होते. संध्याकाळी पाचनंतर उकाडा काहीसा कमी झाला. सातनंतर ढगांचा गडगडाट सुरू झाला. विजाही चमकल्या आणि शहरासह उपनगरांतही वळीव बरसला. गेल्या चार दिवसांपासून हुलकावणी दिलेल्या वळवाने हजेरी लावली. त्यामुळे वातावरणात काहीसा गारवा निर्माण झाला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com