Konkan Railway : प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! कोकण रेल्वेसाठी लवकरच होणार सर्व्हे; महाव्यवस्थापकांची माहिती

सह्याद्री एक्स्प्रेस (Sahyadri Express) पुन्हा सुरू करू, कोल्हापूर- तिरुपती - हैदराबाद मार्गे सुरू करण्यासाठी विभागीय व्यवस्थापकांशी चर्चा करू.
Central Railway
Central Railwaysakal
Summary

"रेल्वे स्थानकाचे सुशोभीकरण करणार आहोत. फर्निचर, कोणते डबे कोणत्या ठिकाणी उभे करावेत, यासाठी जागा निश्चित होईल, त्यांची माहिती प्रवाशांना सहजपणे समजेल, अशी सुसूत्रता आणली जाईल.

कोल्हापूर : कोकण रेल्वेसाठी (Konkan Railway) पुन्हा 28 किलोमीटरचा सर्व्हे स्वतंत्रपणे करावा लागेल, त्यासाठी प्रस्ताव तयार केला आहे. कोल्हापूर रेल्वे स्थानकाचा (Kolhapur Railway Station) अमृत भारत योजनेत विकास करू, असं आश्वासन मध्य रेल्वेचे (Central Railway) महाप्रबंधक नरेश लालवाणी यांनी येथे पत्रकारांशी बोलताना दिले.

सह्याद्री एक्स्प्रेस (Sahyadri Express) पुन्हा सुरू करू, कोल्हापूर- तिरुपती - हैदराबाद मार्गे सुरू करण्यासाठी विभागीय व्यवस्थापकांशी चर्चा करू, असंही त्यांनी सांगितलं. राजर्षी शाहू महाराज टर्मिनसच्या पाहणीसाठी ते काल कौल्हापूर दौऱ्यावर आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

Central Railway
Karnataka Election : ऑपरेशन थिएटरमधून थेट निवडणूक आखाड्यात; राजकारणाची 'सर्जरी' करण्याचा डॉक्टरांचा मानस

लालवाणी म्हणाले, "रेल्वे स्थानकाचे सुशोभीकरण करणार आहोत. फर्निचर, कोणते डबे कोणत्या ठिकाणी उभे करावेत, यासाठी जागा निश्चित होईल, त्यांची माहिती प्रवाशांना सहजपणे समजेल, अशी सुसूत्रता आणली जाईल. कोरोनामुळे अनेक मार्गावरील रेल्वे गाड्या बंद झाल्या. त्या अद्याप सुरू नाहीत. तसेच दुरुस्तीची कामे, दुहेरीकरण सुरू आहे. पुढील वर्षी बहुतांशी कामे पूर्ण होतील, त्यानंतर गाड्या किंवा डबे वाढवणे वेळापत्रकात सुधारणे शक्य होईल. "

Central Railway
Jaykumar Gore : स्मशानभूमीलगत अपघात, आमदार आता काय यातून वाचत नाही; गोरेंनी शेअर केला थरारक अनुभव

ते पुढं म्हणाले, "ज्या मार्गावर प्रवाशांचा प्रतिसाद आहे, अशा मार्गांवर आमचा भर राहील. काही विषय धोरणाशी निगडित आहेत. त्यासाठी तरतूद करावी लागते. त्यासाठी संबंधित विभागांशी चर्चा करावी लागेल. निधी मंजूर आहे, त्यापैकी रेल्वे स्थानकाच्या विकासाची कामे होतील. यातून फुड कोर्ट, पार्किंग प्रवासी आसन व्यवस्था, पाणी प्रवेशद्वार अशी पायभूत सुविधांची कामे लवकर करण्यावर भर आहे." पृथ्वीराज महाडिक, अरिहंत फाउंडेशनचे जयेश ओसवाल यांनी प्रवाशांच्या वतीने निवेदन दिले. उपमहाव्यस्थापक इंदुराणी दुबे, वाणिज्य महाव्यवस्थापक डॉ. रामदास भिसे, रेल्वे सल्लागार समितीचे अध्यक्ष शिवनाथ बियाणी, सत्यजित कदम आदी उपस्थित होते.

Central Railway
Political News : अजित पवारांमुळेच शिवसेनेचे आमदार फुटले; रामदास कदम यांचा मोठा गौप्यस्फोट

पादचारी पुलाचे काम लवकरच

फाटकाजवळील भिंत बांधल्याने पादचाऱ्यांना परीख पुलाखालून धोकादायक स्थितीत जावे लागते. महापालिका व रेल्वे प्रशासनात समन्वय नसल्याने उड्डाण पुलाचे काम रखडले आहे. याबाबत विचारणा केली असता, पादचारी पुलाचे काम लवकर सुरू करण्यात येईल, तसेच सरकत्या जिन्याचे काम पूर्ण झाले, तोही लवकरच सुरू करण्यात येईल, अशी माहिती दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com