esakal | व्यापाऱ्यांच्या प्रश्नांसाठी इचलकरंजीत स्वाभिमानी आक्रमक;मलाबादे चौकात निदर्शने सुरू
sakal

बोलून बातमी शोधा

व्यापाऱ्यांच्या प्रश्नांसाठी इचलकरंजीत स्वाभिमानी आक्रमक

व्यापाऱ्यांच्या प्रश्नांसाठी इचलकरंजीत स्वाभिमानी आक्रमक

sakal_logo
By
ऋक्षिकेश राऊत

इचलकरंजी (कोल्हापूर) : सोमवार पासून शासनाने कायदेशीर दुकाने उघडण्यास परवानगी न दिल्याने मागणीवर ठाम असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटना (Swabhimani Shetkari Sanghatana) रस्त्यावर उतरली. संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मलाबादे चौकात निदर्शने केली. शुक्रवारी व्यापाऱ्यांना परवानगी न दिल्याने व्यापाऱ्यांच्या पाठीशी राहण्याचा निर्णय माजी खासदार राजू शेट्टी यांनी घेतला होता. मात्र सोमवारपासून शासनाने कायदेशीर परवानगी दिली नाही. त्यामुळे मागणीवर ठाम असलेल्या शेतकरी संघटना रस्त्यावर उतरून व्यापाऱ्यांच्या प्रश्नासाठी आक्रमक झाली आहे. गर्दी करणे आमच्या डाव्या हाताचा खेळ असून ही शेतकऱ्यांची गर्दी व्यापाऱ्यांच्या प्रश्नासाठी आहे. दुकाने उघडणाऱ्यांच्या पाठीशी स्वाभिमानी शेतकरी संघटना ठामपणे उभे राहील, असे माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी सांगितले.(swabhimani-party-workers-aggressive-for-traders-all-shop-open-isshu-kolhapur-lockdown-update)

हेही वाचा- Kolhapur Lockdown Update :दुकाने उघडण्याबाबत तूर्तास निर्बंध कायम; शहरी, ग्रामीणसाठी यापुढे एकच नियम

रविवारी रात्रीपासून पोलिसांनी कारवाईचा इशारा देत संपूर्ण शहरातून व्यापाऱ्यांना दुकाने न उघडण्याबाबत आवाहन केले होते. आमदार प्रकाश आवाडे यांनी आंदोलनातून माघार घेतली. मात्र व्यापाऱ्यांच्या प्रश्नासाठी ठाम असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरली आहे. जनता चौकात व्यापार सुरू करण्याच्या मागणीसाठी जोरदार निदर्शने सुरू आहेत. मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यामुळे शहरात दुकाने सुरू करण्याबाबत मोठ्या तणावाचे वातावरण बनले आहे.

loading image