शेट्टींची गाडी पुन्हा डावीकडून उजवीकडे...

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी चळवळीच्या मुशीत तयार झालेले नेते आहेत.
raju shetti
raju shettisakal

इस्लामपूर : पूरग्रस्तांच्या प्रश्‍नावरून रस्त्यावर उतरत आंदोलन करणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांनी वाळवा, शिराळा तालुक्यात भाजपच्या नेत्यांशी सलगी वाढवली आहे. त्यांची चळवळीची गाडी परत एकदा डावीकडून उजवीकडे वळू लागली आहे. भाजपचे नेते दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या उपस्थितीत त्यांनी गेल्या आठ वर्षांपूर्वी येथील यल्लामा चौकात भाजपला पाठिंबा दिला होता. त्याचीच पुनरावृत्ती भाजपचे माजी आमदार शिवाजीराव नाईक व इस्लामपूरचे नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांच्या उपस्थितीत मंगळवारी झाली. येथे त्यांनी महाविकास आघाडी सरकारचे वाभाडे काढतानाच भाजपला गोंजारत नव्या मांडणीचे संकेत दिले आहेत.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी चळवळीच्या मुशीत तयार झालेले नेते आहेत. आजपर्यंत त्यांनी आंदोलने, चळवळ, मोर्चे याद्वारे शेतकऱ्यांचे हित आदी प्रश्‍न‍ मांडत एक वेळ विधानसभा आणि दोनवेळा लोकसभा जिंकली. सर्वसामान्य जनता व गोरगरीब, कष्टकरी शेतकऱ्यांचे प्रश्न मांडून ते शेतकरी, कष्टकऱ्यांचे नेते बनले.

raju shetti
शेणगाव येथे गावाशेजारी आढळला राज्यप्राणी 'शेकरू'

आपल्या प्रश्‍नाला, अडचणींना उभा राहणारा माणूस म्हणून शेट्टींना मतदारांनी गेल्या लोकसभा निवडणुकीपर्यंत भरभरून दिले, मात्र राजकारण करत असताना काही तडजोडी कराव्या लागतात, या तडजोडीतूनच त्यांनी गेल्या आठ वर्षांपूर्वी विरोधी बाकावर असलेल्या भाजपशी सलगी केली. कारखानदारांच्या विरोधात आवाज उठवून परत एकदा ते लोकसभेत गेले. त्यांचे सहकारी सदाभाऊ खोत यांना भाजपच्या कोट्यातून विधान परिषदेत आमदारकी आणि मंत्रिपद दिले. ते मंत्रिपदच संघटनेत फुटीचे कारण ठरले. दोन्ही नेत्यांचा इगो घातकी ठरला. संघटना फुटली. सदाभाऊ खोत भाजपच्या बाजूने आक्रमक झाले, तर खोत यांना शह देण्यासाठी शेट्टींनी ज्या कारखानदारांना शिव्या देण्यात हयात घालवली त्या राष्ट्रवादीशी जुळवून घेतले.

raju shetti
शिवज्योती मोहीम ३० ऑगस्टला कोल्हापूरात

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष मंत्री जयंत पाटील यांच्या इस्लामपूर येथील दूध संघात जाऊन लस्सीचा आस्वाद घेतला. तिथूनच त्यांनी राष्ट्रवादीशी सलगी वाढवली. त्यांचा लोकसभेला धक्कादायक पराभव झाला, मात्र बारामती येथे जात राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची भेट घेत त्यांनी विधान परिषदेसाठी आपला खुट्टा बळकट केला. या सर्व घडामोडीत शेट्टींच्या बरोबर उन्हातान्हाची पर्वा न करता आंदोलनात उडी घेणारी सर्वसामान्य जनता मात्र हळूहळू त्यांच्यापासून दुरावत गेली. कारखानदारांना शिव्या देणारे शेट्टी त्यांच्या मांडीला मांडी लावून बसू लागले हे जनतेला रुचले नाही.

राष्ट्रवादीशी सलगी करून लोकसभेच्या निवडणुकीला सामोरे गेलेल्या शेट्टींना सर्वसामान्य जनतेने साफ नाकारले. लाखभर मतांनी पराभव झाला. जनतेला शेट्टींच्या बेडुकउड्या पसंत पडल्या नाहीत. राजकारणात तडजोड आवश्यक असते, असे असले तरी चळवळीच्या माणसांनी केलेली तडजोड लोकांना रुचत नाही, हा इतिहास आहे. तो शेट्टींनाही लागू आहे. त्यामुळे परत एकदा डावीकडून उजवीकडे झुकलेल्या शेट्टींची तजजोड सर्वसामान्य लोकांना मान्य होइल की नाही? हे येणारा काळच ठरवेल.

raju shetti
मराठा आरक्षणप्रश्‍नी खासदार संभाजीराजे घेणार राष्ट्रपतींची भेट

आघाडी सरकारवर शेट्टींची तोफ सुरू

शेट्टींनी आता परत एकदा राष्ट्रवादी, काँग्रेस व शिवसेना या महाविकास आघाडीवर पूरग्रस्तांचा मुद्दा हातात घेत तोफ डागण्यास सुरवात केली आहे. इस्लामपूरच्या आंदोलनात स्वाभिमानीच्या हाकेला लोक जमणार नाहीत, याचा पुरता अंदाज आल्याने त्यांनी माजी आमदार शिवाजीराव नाईक व निशिकांत पाटील यांना बरोबर घेत मोर्चा काढला. शेट्टींनी या आंदोलनाच्या व्यासपीठावरून गेल्या सरकारने २०१९ ला पूरग्रस्तांना शोधून सानुग्रह अनुदान तत्काळ दिले, मात्र यावर्षी पूर येवून महिना होऊन गेला तरी लोकांच्या खात्यावर रुपया जमा झालेला नाही. त्यामुळे हे सरकार खाली खेचले पाहिजे, असे आवाहन करत भाजपला गोंजारले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com