

Swabhimani Shetkari Sanghatana leader Raju Shetti announces the suspension of the 61-hour chakka jam protest at Kini toll plaza after reaching an agreement on sugarcane prices.
esakal
उसाच्या दरावरून पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील किणी टोलनाक्यावर सुरू असलेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे चक्काजाम आंदोलन अखेर ६१ तासांनंतर स्थगित करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत साखर कारखानदारांनी दिलेला सुधारित दराचा प्रस्ताव संघटनेने मान्य केला. त्यानंतर माजी खासदार राजू शेट्टी यांनी किणी टोलनाक्यावर आंदोलक शेतकऱ्यांशी संवाद साधत आंदोलन स्थगित करत असल्याची घोषणा केली. या निर्णयामुळे शनिवारी पुकारण्यात आलेला कोल्हापूर बंदही मागे घेण्यात आला आहे.