esakal | सदाभाऊ खोत यांच्या मुलाकडून स्वाभिमानीच्या कार्यकर्त्याला मारहाण
sakal

बोलून बातमी शोधा

Beating.

सदाभाऊ खोत यांच्या मुलाकडून स्वाभिमानीच्या कार्यकर्त्याला मारहाण

sakal_logo
By
विजय लोहार

नेर्ले (सांगली): आमदार सदाभाऊ खोत यांचा मुलगा सागर खोतसह चौघांनी तांबवे (ता. वाळवा) येथील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या रविकिरण माने या कार्यकर्त्याच्या घरात घुसून चाकू, तलवारी, गुप्ती घेऊन लाथा बुक्क्यांनी मारहाण करीत शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार घडला. सोमवारी रात्री ९ च्या सुमारास हा प्रकार घडला. याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते रविकिरण राजाराम माने (वय ३५) यांनी कासेगाव पोलिसांत तक्रार दिली आहे. कासेगाव पोलिसात सागर खोतसह चौंघावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रविकिरण माने यांनी कासेगाव पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा वाळवा तालुका युवक आघाडीचा मी अध्यक्ष आहे. माजी खासदार राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातुन शेतकरी आंदोलन व संघटनेचे काम करतो. या कारणाने रयत क्रांती संघटनेचे कार्यकर्ते माझ्यावर चिडुन होते.

हेही वाचा: Konkan Rain Update: चिपळूण, दापोलीला सतर्कतेचा इशारा

रयत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सदाभाऊ खोत यांचेवर शेतकरी हितावरुन टिका केलेचा राग मनात धरून माझ्यावर हल्ला केला. यावेळी तु सदाभाऊंच्यावर टिका करतोस. तुला मस्ती आली आहे". असे म्हणून शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी दिली. त्यावेळी भास्कर विष्णु मोरे व विश्वास वसंत जाधव यांनी विरोध केला. परंतु चौघांनी धक्काबुक्की करुन ढकलून दिले .आरडाओरडा केल्यानंतर ते घरातुन बाहेर गेले. या घटनेची तक्रार कासेगाव पोलिसात दिली आहे. याबाबत कासेगाव पोलिसांत घरात घुसून मारहाण करणे,जाणीव पूर्वक मारहाण करणे, शांतता भंग करणे व धमकावणे असे विविध गुन्हे दाखल झाले आहेत.

loading image
go to top