RegularTaxpayers Feel Cheated : वर्षानुवर्षे कर न भरणाऱ्यांना सवलत दिल्याने वेळेवर कर भरणाऱ्या नागरिकांमध्ये तीव्र असंतोष व्यक्त होत आहे. थकीत कर सवलतीमुळे होणाऱ्या महसूल घटेची भरपाई शासनाकडून न मिळाल्याने ग्रामपंचायती आर्थिक अडचणीत येण्याची शक्यता आहे.
नृसिंहवाडी : महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज योजना’ या नावाखाली ग्रामपंचायतींच्या निवासी कर थकबाकीवर ५० टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे.