
Kolhapur : सेनापती कापशी येथील एका विद्यालयातील शिक्षकाने इयत्ता नववीत शिकणाऱ्या मुलींशी वारंवार अश्लील वर्तन केले. हे पालकांना समजल्यावर चिडलेल्या पालकांनी आज मोठ्या जमावाने शाळेत जाऊन त्याला बेदम चोप दिला. निसारीअहमद मोहिद्दिन मुल्ला (वय ५२, रा. सेनापती कापशी) असे त्याचे नाव आहे. मुरगूड पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन ‘पोक्सो’अंतर्गत गुन्हा दाखल केला. या घटनेचा निषेध करण्यासाठी कापशी बाजारपेठ बंद ठेवण्यात आली.