

Education Department Issues
sakal
कोल्हापूर : शिक्षक पात्रता परीक्षेच्या (टीईटी) सक्तीविरोधात शिक्षकांनी उद्या, शुक्रवारी शाळा बंद आंदोलन पुकारले आहे. त्यात सहभागी होणाऱ्या शिक्षक, कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन कपात करा, असा आदेश आज कोल्हापूर विभागीय शिक्षण उपसंचालक प्रभावती कोळेकर यांनी प्राथमिक, माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहेत.