esakal | एका शाळेत शिक्षक पाच वर्षे राहणार; शासनाचे सुधारित बदली धोरण

बोलून बातमी शोधा

teachers service in school for five years decision of government in kolhapur

ग्राम विकास विभागाने यापूर्वी 27 फेब्रुवारी 2017 ला प्राथमिक शिक्षकांसाठी बदल्यांचे धोरण जाहीर केले होते.

एका शाळेत शिक्षक पाच वर्षे राहणार; शासनाचे सुधारित बदली धोरण
sakal_logo
By
राजेंद्र पाटील

कोल्हापूर : जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांसाठी सुधारित धोरण शासनाने जाहीर केले. खो-खो पद्धतीच्या बदलीत शिक्षकांना दिलासा मिळाला असून यापुढे एका शाळेत शिक्षकाची सेवा पाच वर्षे पूर्ण झाल्यानंतरच तो बदलीस पात्र होणार आहे. याशिवाय अवघड क्षेत्रातील शाळा घोषित करण्यासाठी निकष जाहीर केले आहेत.

ग्राम विकास विभागाने यापूर्वी 27 फेब्रुवारी 2017 ला प्राथमिक शिक्षकांसाठी बदल्यांचे धोरण जाहीर केले होते. राज्यस्तरावरून ऑनलाईन पद्धतीने खोखो स्वरूपाच्या या बदल्या होत होत्या. या धोरणाला शिक्षक संघटनांनी विरोध केला होता. दोन वर्षात शासनाने नऊ शुद्धिपत्रके काढली होती, परंतु तरीही बदली धोरणाबाबत शिक्षक संघटनात मोठा असंतोष होता.

अखेर महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यावर ग्रामविकास विभागाने शिक्षकांच्या बदली धोरणात सुधारणा करण्यासाठी बदली अभ्यास गट स्थापन केला.या अभ्यास गटाने लोकप्रतिनिधी, पालक व शिक्षक संघटना यांच्याशी चर्चा केली. सुधारित धोरण तयार करून ते आज जाहीर केले. शिक्षकांच्या बदलीचे सुधारित धोरण जाहीर केल्याबद्दल ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचे प्राथमिक शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष राजाराम वरुटे यांनी एका पत्रकाद्वारे अभिनंदन केले आहे.

हेही वाचा - गोकुळ रणांगण; सत्तारूढ गटाचे नेते उतरले मैदानात, संचालकांवर जबाबदारी निश्‍चित

बदली धोरणातील प्रमुख बदल

विद्यमान शाळेत शिक्षकांची सेवा पाच वर्षे पूर्ण झाल्यानंतरच बदलीस पात्र विशेष संवर्ग 1 व 2 मधील शिक्षकांनी बदलीचा लाभ घेतल्यानंतर त्यांना पुढील तीन वर्षे विनंती बदलीसाठी अर्ज करता येणार नाही. 30 शाळांचा पसंतीक्रम बदलीसाठी द्यावा लागणार. अवघड क्षेत्राच्या सात निकषापैकी तीन निकष पूर्ण केलेले गाव/शाळा अवघड क्षेत्र शाळा म्हणून घोषित केली जाणार आहे.

सकाळचे अचूक वृत्त 
अवघड क्षेत्रातील शाळा ठरविण्यासाठी सात निकष जाहीर होणार, सुधारित बदली धोरण जाहीर होणार अशी बातमी दैनिक सकाळने प्रसिद्ध केली होती. सकाळचे हे वृत्त अचूक ठरले.