या शासन निर्णयानुसार पदाच्या संरक्षणाचे, निकषांचे ऑनलाईन प्रणालीमध्ये (Online System) पालन झाले नसल्याने इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतचे अनेक शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत.
कोल्हापूर : शासनाने संचमान्यतेच्या सुधारित धोरणात लहान शाळांमध्ये तिसऱ्या शिक्षकाच्या मंजुरीसाठी पटाची अट ७६ पर्यंत वाढवली आहे. जी पूर्वी ६१ इतकी होती. त्यामुळे या शाळांना नव्याने शिक्षक मिळण्याची शक्यता कमी आहे. या सुधारित निकषाचा फटका विद्यार्थी, शिक्षकांना (Teacher) बसणार आहे.