esakal | मुद्रांक विक्रेत्यांना फटका; स्टॅंपची वाटचाल होणार इतिहासजमा
sakal

बोलून बातमी शोधा

मुद्रांक विक्रेत्यांना फटका; स्टॅंपची वाटचाल होणार इतिहासजमा

मुद्रांक विक्रेत्यांना फटका; स्टॅंपची वाटचाल होणार इतिहासजमा

sakal_logo
By
युवराज पाटील

कोल्हापूर : मुद्रांक व नोंदणी महानिरीक्षकांतर्फे तंत्रज्ञानाचा वापर दिवसेंदिवस वाढत असून, त्याचाच एक भाग म्हणून एकेकाळी नोंदणी व्यवहारात महत्त्वाचे मानले जाणारे मुद्रांक (स्टॅंप) (stamp) आता कालबाह्य होऊ लागले आहे. शंभर रुपयांच्या स्टॅंपवरच उर्वरित व्यवहार होत असून, भविष्यात ही यंत्रणाही नामशेष होईल, असे चित्र आहे. दरम्यान, ज्यांचा उदारनिर्वाह या मुद्रांक विक्रीवर होता, ते विक्रेते मात्र अडचणीत येणार आहेत.

खरेदी व विक्री व्यवहारासाठी तसेच बॅंकांची कर्ज प्रकरणे, विविध प्रतिज्ञापत्रांसाठी स्टॅंप पुरावा मानला जायचा. विक्रेत्यांकडे मुद्रांक खरेदीला जाण्यासाठी वेटिंगवर राहायला लागायचे. ओळखपत्राचा पुरावा, स्टॅंप नेमका कशासाठी हवा आहे?, माहितीसह स्वाक्षरी आवश्यक असायची. शंभर, पाचशे, १५ हजार ते ३० हजारांपर्यंतच्या किमतीचे हे स्टॅंप असायचे. वाढीव किमतीचे स्टॅंपही रद्द झाले असून, केवळ १०० व ५०० चे स्टॅंप उपलब्ध आहेत.

हेही वाचा: हदयद्रावक! तार तुटून मायलेकरचा मृत्यू, चिमुकला गेला होता वाचवायला

कर्ज प्रकरणात बॅंका नजरगहाण म्हणून संबंधित मिळकतीची कागदपत्रे आपल्याकडे ठेवतात. हा व्यवहारही ऑनलाईन झाला आहे. कोल्हापूर शहर व करवीर तालुक्यात सुमारे ६० विक्रेते आहेत. विक्रेत्यांच्या परवान्याचे दरवर्षी नूतनीकरण केले जाते. ऑनलाईन व्यवस्थेने मात्र आता स्टॅंपचे महत्त्वच कमी झाले आहे. एकेकाळी शंभरचा स्टॅंप घ्यायचा असेल तरी वशिल्याची गरज असायची. ऑनलाईन व्यवस्थेने ही सगळी यंत्रणा बदलून टाकली आहे. ‘डिजिटल सिग्नेचर''च्या माध्यमातून आता प्रॉपर्टी कार्डही ऑनलाईन मिळू लागले आहे.

या खरेदी-विक्री व्यवहात यापुढील एक भाग म्हणून संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन होण्याच्या मार्गावर आहे. खरेदी घेणारा व देणारा आणि साक्षीदार यांना सध्या दुय्यम निबंधक कार्यालयात जावे लागते. मात्र, येत्या काळात खरेदी घेणारा, देणारा व साक्षीदारांनाही नोंदणी कार्यालयात जाण्याची गरज भासणार नाही. पारदर्शक व्यवहारासाठी ती योग्य असली, तरी विक्रेत्यांबाबत अडचण निर्माण करणारी आहे.

हेही वाचा: सिंधुदुर्गच्‍या पाऊलखुणा! संस्थानच्या सरदारांमध्येच जुंपली लढाई

"खरेदी-विक्री व्यवहारात अधिक पारदर्शकता येण्यासाठी ई-चलनाचा पर्याय आता उपलब्ध झाला, पक्षकारांसाठी ही चांगली गोष्ट आहे. या व्यवस्थेचा पक्षकारांनी अधिकाधिक वापर करावा. मुद्रांक विक्रीतील गैरप्रकारावरही त्यामुळे आळा बसणार आहे."

- श्रावण हर्डीकर, मुद्रांक व नोंदणी महानिरीक्षक

loading image