esakal | पन्हाळा पंचायत समिती सभापती पदी तेजस्विनी शिंदे यांची बिनविरोध निवड
sakal

बोलून बातमी शोधा

Tejaswini Shinde elected as Panhala Panchayat Samiti Chairperson

पन्हाळा पंचायत समितीच्या सभापती निवडची प्रक्रिया आज राबविण्यात आली.

पन्हाळा पंचायत समिती सभापती पदी तेजस्विनी शिंदे यांची बिनविरोध निवड

sakal_logo
By
राजेंद्र दळवी

आपटी - पन्हाळा पंचायत समिती सभापती निवडीसाठी पन्हाळा पंचायत समितीच्या सभागृहात पार पडलेल्या विषेश सभेत सभापती पदी सौ. तेजस्विनी शिंदे यांची बिनविरोध निवड झालेचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार रमेश शेंडगे यांनी जाहीर केले.

पन्हाळा पंचायत समितीच्या सभापती निवडची प्रक्रिया आज राबविण्यात आली. पन्हाळा पंचायत समितीमध्ये जनसुराज्य शक्ती पक्षाचे निर्विवाद बहुमत आहे. पक्षाचे अध्यक्ष आमदार डॉ. विनय कोरे यांनी पन्हाळा पूर्व व पश्चिम  भागाचा समतोला राखण्याची परंपरा कायम ठेवली आहे. त्यामुळे पूर्व  पन्हाळ्यातील कोडोली पूर्व गणातून निवडून आलेल्या सौ. तेजस्विनी रणजीत 
शिंदे यांचे नाव सभापती पदी, सर्वानुमते निश्चित केले होते. तेजस्विनी शिंदे याच्यामुळे कोडोली पूर्व गणा बरोबरच जाखले गावालाही पंचायत समितीच्या इतिहासात पहिल्यांदाच सभापती पदाचा मान मिळाला आहे. या पूर्वी  या गणातून निवडून आलेल्या बहिरेवाडी येथील रविंद्र जाधव यांनी उपसभापती पद भूषविले होते. गीतादेवी पाटील यांनी सभापती पदाच्या कालावधीत वारंवार तालुक्यातील ग्रामपंचायतींना भेटी देत तेथील कामकाजाची पहाणी  करून अनेक योजना नियोजनबध्द व प्रभावीपणे राबवून आपल्या कामाचा ठसा  उमटवला आहे. त्यामुळे नूतन सभापतींच्या जबाबदारीत वाढ झाली आहे.

यावेळी  जिल्हा परिषद  सदस्य शंकर पाटील, शिवाजी मोरे, विशांत महापुरे, मावळत्या सभापती गीतादेवी पाटील, विद्यमान उप सभापती रश्मी कांबळे, माजी सभापती अनिल कंदूरकर, पृथ्वीराज सरनोबत, पंचायत समिती सदस्य संजय माने, उज्वला पाटील, वैशाली पाटील, प्रकाश पाटील, रवी चौगले, रेखाताई बोगरे, पन्हाळा नगराध्यक्षा रुपाली धडेल  उपस्थित होते.

हे पण वाचाधक्कादायक : दुकानदाराला दमदाटी करून हजारो किलो धान्यावर नगरसेवकांचा डल्ला

सभापती पदाच्या काळात नाविन्यपूर्ण उपक्रमाद्वारे पाणी, आरोग्य, शिक्षण, दळण-वळणासह शासनाच्या सर्वच योजना प्रभावीपणे राबवून आमचे नेते डॉ. विनयरावजी कोरे यांनी माझ्यावर टाकलेला विश्वास सार्थ ठरवेन.

-तेजस्विनी शिंदे, सभापती पन्हाळा पंचायत समिती

संपादन - धनाजी सुर्वे 

loading image
go to top