esakal | मगरीच्या दहा पिल्लांचा मृत्यू : एक पिल्लावर यशस्वी उपचार
sakal

बोलून बातमी शोधा

मगरीच्या दहा पिल्लांचा मृत्यू : एक पिल्लावर यशस्वी उपचार

मगरीच्या दहा पिल्लांचा मृत्यू : एक पिल्लावर यशस्वी उपचार

sakal_logo
By
शिवाजी यादव -सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर: कृष्णानदी (krishna river)काठीत मगरींचा (Crocodile)वावर आहे. यातील मादी मगरीने कनवाड (ता. शिरोळ) (kanwad silol)तालुक्यातील हद्दीत नदी काठच्या घळीत २६ अंडी घातली. गवत काढण्यास गेलेल्या शेतकऱ्यांना अंडी दिसली. वनविभागालाही त्याचा सुगावा लागला. खबरदारीचा भाग म्हणून वनविभागाने लोकांना हा परिसर जाण्यासाठी बंद केला. (ten-Crocodiles-died-summer-hit-in-krishna-river-shirol-kolhapur-news)

दोन दिवसात अंड्यातून मगरीचे पल्ले जन्माला आली त्याच वेळी उन्हाचा तडाखा वाढला, मगरीच्या तब्बल दहा पिल्लांचा जागेवर मृत्यू झाला. उर्वरीत पिल्ले जीवंतपणीच नदीच्या प्रवाहासोबत गेल्याच्या खाणा खूणाही आढळल्या आहेत, यातील एक पिल्लू कसेबसे जगले त्याला वन विभागाने पशूवैद्यकांकडील उपचाराव्दारे तंदुरूस्त केले त्याला अधिवासात सोडलेही वनविभागाने याघटनेबाबत कमालीची गुप्तता पाळली होती.

हेही वाचा- स्वॅब दिलेली व्यक्ती बाहेर दिसताच बसणार दंड

शिरोळ तालुक्यातून कृष्णानदी वाहते, कृष्णा - पंचगंगा नदीचा संगम आहे, याभागात मगरींचा वावर गेल्या काही वर्षात वाढला आहे. ज्या भागात मानवी वर्दळ अधिक तिथे शक्यतो मगर दिसत नाही मात्र ज्या भागात निरव शांतता नदी काठी चिखल व गवताचा भाग आहे अशा ठिकाणी मगरी पहूडल्याचे शेतकऱ्र्यांनी अनेकदा पाहीले आहे. त्यामुळे या भागात वनविभागाची गस्तही असते.

गेल्या आठ दिवसापूर्वी एका गावात मगरीने अंडी घातल्याची माहिती शेतकऱ्र्यांना व वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना समजली वनकर्मचाऱ्र्यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पहाणी केली. २६ अंडी दिसली मात्र मगरीचा अधिवास असल्याने त्या अंड्याला कोणताही धोका होऊ नये तसेच मादी मगरी याच परिसरात असल्याने अंड्याना धक्का लागल्यास धोका वाढू शकतो. ही बाब गृहीत धरून या परिसरात कोणीही जाऊ नये यासाठी नदीकडे जाणारे रस्ते वर्दळीसाठी बंद केले. अंडी दिसल्याची घटना वनविभागाने गोपनिय ठेवली. मात्र ज्यांनी मगरीची अंडी पाहीली होती. त्यांच्याकडूनही मगरीची अंडी दिसल्याची चर्चा नदी काठच्या गावात पसरली.

दोन दिवसानंतर वनविभागाला त्याच जागी मगरीची दहा पिल्ली मृतावस्थेत सापडली वनविभागाने शोधा शोध केल्यानंतर नुकतेच जन्मलेले एक पिल्लू गवतात आढळून आले त्यानंतर त्या पिल्लाला तातडीने वनविभागाने जयसिंगपूर येथील शासकीय पशू वैद्यकीयांकडे दाखल केले तेथे त्या पिल्लावर उपचार केले त्यानंतर तंदुरूस्त झालेले पिल्लू अधिवासात सोडण्यात आले.

मगरीची एकूण २६ अंडी परिसरात दिसली.

अंड्यातून पिल्ले जन्माला आलेली दहा पिल्ले मृत.

एक पिल्लू जीवंत होते.

उर्वर्रीत जन्मलेली १५ पिल्ले मादी मगरी सोबत पाण्यात गेली असावीत किंवा त्याच भागात इतरत्र विखुरलेली असावीत असा अंदाज वनविभागाचा आहे.

मगरीच्या दहा पिल्लांचा मृत्यू झाल्याची पहिलीच घटना.

शेतकरी वर्गामुळे घटना चर्चेत आली.

ति मगर व अन्य पिल्लांचा शोध घेणे मुश्कील.

‘‘ कृष्णानदी काठी मगरी आहेत वरील घटलेली घटना खरी आहे त्याभागातील मगरींच्या हालचालीवर वनविभाग लक्ष ठेवून आहे, तरीही विणीच्या हंगामात मगर आक्रमक झालेल्या असतात त्यामुळे लोकांनी सावधगिरी बाळगावी शक्यतो नदीकाठी फिरणे किंवा शेतीकामास जाणे टाळावे.’’

घनश्याम भोसले (वनपाल हातकणंगले)