पूर्वी पन्हाळा नगरपरिषदेकडे असलेले शिवस्मारकाचे काम पूर्ण करण्याची जबाबदारी आजच्या बैठकीत सार्वजनिक बांधकाम विभागाकडे देण्यात आली आहे.
पन्हाळा : ऐतिहासिक पन्हाळगडावरील (Panhalgad) शिवतीर्थ तलावातील रखडलेल्या शिवस्मारकासंदर्भात झालेल्या बैठकीत उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी १० कोटी रुपयांचे अनुदान मंजूर केल्याची घोषणा आज केली. त्याबाबत तातडीने अधिसूचनाही काढल्याची माहिती आमदार चंद्रदीप नरके (Chandradeep Narke) यांनी दिली.