दहा लाखांच्या बनावट नोटा जप्त ; कळंबा, पासार्डेतील टोळी गजाआड

कळंबा, पासार्डेतील दोघांना अटक, निर्मितीचे साहित्यही जप्त
दहा लाखांच्या बनावट नोटा जप्त ; कळंबा, पासार्डेतील टोळी गजाआड
Updated on

इचलकरंजी : येथील एका बॅंकेच्या कॅश डिपॉझिटमध्ये मिळून आलेल्या बनावट नोटांच्या आधारे शिवाजीनगर पोलिसांनी आंतरराज्य टोळीचा छडा लावला. बनावट नोटा चलनात आणणाऱ्या टोळीतील मुख्य संशयितांसह दोघांला अटक केली आहे. आंबाजी शिवाजी सुळेकर (वय ४२, रा. पासार्डे ता. करवीर), राजूभाई इस्माईल लवंगे (५५ रा. कळंबा) अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून पोलिसांनी दोन हजार, पाचशे, दोनशे, शंभर आणि पन्नास रुपयांच्या एकूण दहा लाख ५४ हजार ४०० रुपयांच्या बनावट नोटा आणि त्यासाठी वापरलेली साधनसामुग्रीही जप्त केली आहे. संशयितांनी कर्नाटकातही खपवलेल्या बनावट नोटांचा तपास सुरू असल्याची माहिती पोलिस निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांनी आज येथे दिली.

या कारवाईबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी :

एका बँकेच्या कॅश डिपॉझिटमध्ये बारा दिवसांपूर्वी साडेचार हजारांच्या बनावट नोटा सापडल्या होत्या. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यावर गतीने तपास सुरू केला. यातील संशयित आयुब जमादारकडे कसून चौकशी केल्यानंतर एका व्यापाऱ्याचे नाव पुढे आले. कोल्हापुरातील आयुबचा मेव्हणा रिक्षाचालक उस्मान शेखकडून त्या बनावट नोटा आयुबकडे आल्याचे स्पष्ट झाले. शेखकडील चौकशीनंतर बनावट नोटा बनवण्यासाठी आंतरराज्य टोळी कार्यरत असल्याचे तपासात समोर आले. त्यानुसार कोल्हापूर, कळंबा आणि सांगरुळमध्ये संशयितांचा शोध सुरू केला. एक पथक ४८ तास या भागावर लक्ष ठेवून होते.

दहा लाखांच्या बनावट नोटा जप्त ; कळंबा, पासार्डेतील टोळी गजाआड
कोल्हापूरचे नाव 'कलापूर' करा ; सचिन पिळगावकरांची आग्रही मागणी

संशयावरून आंबाजी सुळेकर याच्या सांगरूळ फाट्यावरील सुमन मोबाईल शॉपीवर छापा टाकला. तेथे बनावट नोटा तयार करण्यासाठी वापरत असलेला संगणक, प्रिंटर, स्कॅनर आणि बनावट नोटा मिळून आल्या. त्याच्याकडे कसून चौकशी केली असता कळंबे येथील किराणा दुकानदार राजूभाई लवंगेचाही सहभाग असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे लवंगेला ताब्यात घेतले. चौकशीत बनावट नोटासाठी कार्यरत असलेली कोल्हापूर जिल्ह्यातील रॅकेट उघड झाले. या टोळीने कर्नाटकातही बनावट नोटा खपवल्या असल्याचे समोर आले. त्याचा तपास सुरू असल्याचे निरीक्षक पिंगळे यांनी सांगितले.

Summary

कोल्हापूरसह बेळगाव जिल्ह्यात बनावट नोटा खपवत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

बनावट नोटा प्रकरणाच्या रॅकेटमधील संशयित मोबाईलवरून एकमेकांच्या संपर्कात होते. रक्कम डबल देण्याचे आमिष दाखवून ते बनावट नोटा खपवत होते, असे पोलिस उप अधीक्षक बाबुराव महामुनी यांनी सांगितले. यावेळी उपनिरीक्षक प्रमोद मगर, इकबाल महात, नंदकिशोर कराड, उदय पाटील, प्रशांत ओतारी, इकबाल मणेर, महेश पाटील, प्रकाश कांबळे, अमर मोहिते, रंजना कोरवी उपस्थित होते.

कर्नाटकातही तपास

मुख्य संशयित अंबाजी सुळेकरने बेळगाव येथील एका व्यक्तीकडून सहा लाखाच्या बनावट नोटा घेतल्या. त्या बदल्यात तीन लाखाच्या खऱ्या नोटा तो देणार होता. त्याने स्वतःच्या शॉपीतही नोटा छपाई करून कटिंगचे कामे सुरू केले. तो, कोल्हापूरसह बेळगाव जिल्ह्यात बनावट नोटा खपवत असल्याचे स्पष्ट झाले आहे. याबाबत कर्नाटकसह अन्य राज्यात तपास सुरू असल्याचे पोलिस निरीक्षक पिंगळे यांनी सांगितले.

असा झाला प्रकार उघड

रिक्षा उस्मान शेख व संशयित लवंगे यांची कोल्हापूर लक्ष्मीपुरी खरेदीनिमित्ताने ओळख झाली. शेख उसने घेतलेले ३० हजार रुपये आयुब रमजानला देणार होता. मात्र त्याने त्यातील पाच हजार रुपये खर्च केले. शेखने लवंगेकडून बनावट नोटा घेतल्या. त्या मिळून ३० हजारांची रक्कम आयुब रमजानला दिली. ही रक्कम रमजानने इचलकरंजीतील बॅंकेत भरली. तेथे या नोटा बनावट असल्याचे उघड झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com