
कोल्हापूर : पानारी मळ्यात मोटारीला धडक लागल्याच्या किरकोळ वादानंतर एका टोळक्याने रंकाळा टॉवर परिसरात दहशत करण्याचा प्रयत्न केला. आज सायंकाळी पाचच्या सुमारास हॉकी स्टीक, बेसबॉल बॅट हातात घेऊन तरुणांनी येथील घरात घुसून तरुणाला मारहाण केली. मात्र, याची नोंद रात्री उशिरापर्यंत पोलिस ठाण्यात झालेली नव्हती.