Ichalkaranji : जुन्या वादातून दोन गटांत हाणामारी; इचलकरंजीत परस्परविरोधात गुन्हे दाखल
रात्री साडेअकराच्या सुमारास गावभागातील जैन मंदिराजवळ उपाध्ये यांच्या घरावर जमाव जमवून दगडफेक करण्यात आली. घराच्या खिडक्या फोडून दारातील कुंड्या तोडून नासधूस केली.
Tensions rise in Ichalkaranji as two groups clash over old dispute; police register cases from both sides.Sakal
इचलकरंजी : शहरातील कोरोची परिसरात जुना वाद चिघळल्याने दोन गटांमध्ये मारहाणीचा प्रकार घडला. या घटनेनंतर दोन्ही गटांनी परस्परविरोधी तक्रारी दाखल केल्या असून, शहापूर पोलिस ठाण्यात गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.