

chargesheet submitted in the TET paper leak
sakal
कोल्हापूर : शिक्षक पात्रता परीक्षेचा (टीईटी) पेपर फुटल्याचा प्रकार नोव्हेंबर २०२५ मध्ये उघडकीस आला होता. गुन्ह्याचा तपास करून याची पाळेमुळे बिहारपर्यंत असल्याचे पोलिसांनी उजेडात आणले. शिक्षक, संस्थाचालकांसह २९ जणांविरोधात ८०० पानांचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले. अद्यापही काही परप्रांतीय तरुण पसार असून, त्यांचा शोध घेतला जात
आहे.