TET Paper Leak
esakal
कोल्हापूर : शिक्षक पात्रता परीक्षेतील (टीईटी) पेपर फुटीचे रॅकेट थेट बिहारपर्यंत असल्याची माहिती आज पुढे आली. तेथील दोघांची नावे पुढे आल्याची माहिती स्थानिकंकडून मिळते. मात्र, याबाबत पोलिस अधीक्षकांसह तपास अधिकारी उपअधीक्षकांनी मौन बाळगल्यामुळे तपासाबाबत साशंकता निर्माण झाली आहे.