
आज लॉकडाऊनच्या पहिल्या दिवशी प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करत येथील नागरिकांनी घरातच राहणे पसंत केले. जो तो आपल्या घरात असे जणू चित्र येथील गल्लोगल्ली पहावयास मिळाले.
कोल्हापूर : जो तो आपापल्या घरात, असे जणू चित्र मंगळवार पेठेत पहावयास मिळाले. कायम गजबजलेल्या हा भागात लॉकडाऊनच्या (lockdown) पहिल्या दिवशी शुकशुकाट होता. (The first day of the lockdown in kolhapur was peaceful)
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी रात्री पासून जिल्ह्यात कडक लॉकडाऊन लागू करण्यात आला. त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार आजपासून बंद ठेवण्यात आले. शहरातील मंगळवार पेठ म्हणजे नेहमी वर्दळीचा भाग. शिंगोशी मार्केट, मिरजकर तिकटी, सुबराव गवळी तालीम, साठमारी आदी परिसरात पहाटे पासून रात्री उशिरा पर्यंत नागरिकांची ये-जा असते. रविवार सुट्टी दिवशी त्यात आणखी भर पडते. मात्र आज लॉकडाऊनच्या पहिल्या दिवशी प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करत येथील नागरिकांनी घरातच राहणे पसंत केले. जो तो आपल्या घरात असे जणू चित्र येथील गल्लोगल्ली पहावयास मिळाले. कोरोनाचं संकट किती भंयकर आहे. संसर्गाची साखळी तोडण्यासाठी आता आपण तर घरातच राहायचे असा जणू निर्धार येथील प्रत्येक नागरिकांने केल्याचे मंगळवार पेठेतील आजच्या शुकशुकाटाने जाणवले.
कोरोना संकट भयंकर
कोरोनाच संकट भयंकर आहे. घराबाहेर पडू नका सुरक्षीत रहा...असे प्रबोधन करणारा ‘तुकाराम माळी तालीम मंडळा’च्या फलकावर झळकणारा मजकूर जणू परिसरातील नागरिकांना धोक्याची जाणीव करून देत होता.
(The first day of the lockdown in kolhapur was peaceful)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.