esakal | मुक्त विद्यापीठाचे उद्दिष्‍ट ७ लाख विद्यार्थी
sakal

बोलून बातमी शोधा

sangli

मुक्त विद्यापीठाचे उद्दिष्‍ट ७ लाख विद्यार्थी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

माधवनगर : यंदा ‘गुणवत्ता वर्ष’ घोषित केले आहे. सात लाखांवर विद्यार्थी संख्येचे उद्दिष्ट ठेवले आहे, अशी माहिती कोल्हापूर विभागीय केंद्राचे वरिष्ठ शैक्षणिक सल्लागार डॉ. आर. व्ही. कुलकर्णी यांनी केले आहे.

अनेक कारणांनी शिक्षण अर्ध्यावरच थांबलेल्या परंतु शिकायची इच्छा असलेल्या लोकांसाठी विद्यापीठाने मोठी संधी दिली आहे. साऱ्या अभ्यासक्रमांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. विद्यापीठाच्या अभ्यास केंद्रांमधून प्रवेश प्रक्रिया जोमात सुरू आहे. संबंधितांनी लाभ घ्यावा, असेही ते म्हणाले.

त्यांनी सांगितले, की यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाची स्थापना १ जुलै १९८९ रोजी झाली. विद्यापीठाच्या प्रमाणपत्र, पदविका, पदवी आणि पदव्युत्तर पदवी शिक्षणक्रमास विद्यापीठ अनुदान आयोग आणि महाराष्ट्र शासनाची मान्यता आहे. कोविडचा प्रादुर्भाव असूनही शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये जवळपास सहा लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. या विद्यापीठातून पदवी प्राप्त करून अनेक विद्यार्थी स्पर्धा परीक्षा देवून शासकीय सेवेत उच्च पदावर कार्यरत आहे.

अनेक विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या पदवीमुळे नोकरीत पदोन्नत्ती मिळाली. मुक्त विद्यापीठाची पदवी पूर्ण केलेले विद्यार्थी एमपीएससी./युपीएससी परीक्षेस पात्र आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. कोविड -१९ च्या प्रादुर्भावामुळे विद्यापीठाने शैक्षणिक वर्ष २०१९-२०२० आणि २०२०-२०२१ मध्ये विविध शिक्षणक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची अंतिम /पुरवणी परीक्षा ऑनलाईन पद्धतीने यशस्विरीत्या पार पाडून एक नवा पायंडा पाडला. या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेवून यशस्विरीत्या पार पाडणारे राज्यातील हे एकमेव मुक्त विद्यापीठ आहे.’’

हेही वाचा: सांगली: दुबईतील कंपनीचा व्यापाऱ्याला १ कोटी ३६ लाख रुपयांचा गंडा

कोल्हापूर विभागीय केंद्राच्या कार्यकक्षेत कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे चार जिल्हे येत असून या चार जिल्ह्यांत २५० हून अधिक अभ्यासकेंद्रे कार्यान्वित आहेत. यंदा ४० हजारहून अधिक विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. विद्यापीठ लवकरच रत्नागिरी येथे उपकेंद्र सुरू करत असल्याचे डॉ. कुलकर्णी यानी सांगितले.

चालू शैक्षणिक वर्षाकरिता विद्यापीठ अनुदान आयोगाने एम. ए. मराठी, हिंदी, इंग्रजी, अर्थशास्त्र, लोकप्रशासन आणि उर्दू या शिक्षणक्रमांना आणि एमएससी या शिक्षणक्रमांना मान्यता दिल्यानुसार कोल्हापूर विभागीय केंद्रांतर्गत चार जिल्ह्यांतील विविध वरिष्ठ महाविद्यालयांना वरील शिक्षणक्रम राबविण्यासाठी मान्यता देण्यात येत आहे, असे त्यांनी सांगितले. केंद्रप्रमुख गौतम पाटील, केंद्र संयोजक प्रा. ए. डी. शिंदे आदि उपस्थित होते.

loading image
go to top