esakal | सांगली: दुबईतील कंपनीचा व्यापाऱ्याला १ कोटी ३६ लाख रुपयांचा गंडा
sakal

बोलून बातमी शोधा

Crime

सांगली: दुबईतील कंपनीचा व्यापाऱ्याला १ कोटी ३६ लाख रुपयांचा गंडा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सांगली: येथील द्राक्ष आणि डाळींब निर्यात करणाऱ्या व्यापाऱ्यास दुबईतील कंपनीने तब्बल एक कोटी ३६ लाखांचा गंडा घातला आहे. याप्रकरणी दुबईतील कंपनीच्या दोन मालकांसह मुंबईतील दोघा कर्मचाऱ्यांवर विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

हेही वाचा: सहकार मंत्र्यांच्या पुतणीचा काँग्रेस आमदार पीएन पाटील यांच्यासह मुलाकडून छळ

दुबईतील ओपीसी फुडस्टफ ट्रेडिंग एलएलसी कंपनीचा मालक मुहम्मद फारूक, बद्र अहमद जुमा हुसेन (रा. दुबई) या दोघांसह मुंबईतील व्यवस्थापक दिलीप जोशी (मुंबई), व्यवस्थापक माजीद जलाल (रा. दुबई), अर्थसहाय प्रमुख मंगेश गांगुर्डे (मुंबई) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. पौर्णिमा विजय पाटील (वय ४२) यांनी फिर्याद दिली. याबाबत विश्रामबाग पोलिस ठाण्यात नोंद आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की पौर्णिमा पाटील या उत्तर शिवाजी नगर येथे कुटुंबासह राहतात. त्यांची पीव्हीआयपी एक्सपोर्ट एलएलपी सांगली नावावे आयात, निर्यात करणारी कंपनी आहे. ते द्राक्ष, डाळिंब, नारळ, तांदुळ मालाची खरेदी करून निर्यात करताता. सन २०१९ मध्ये दुबईतील ओपीसी फुडस्टफ कंपनीचा पर्चेस ऑफिसर माजीद जलाल याने मोबाईलवरून संपर्क साधून मालाची चौकशी केली.

त्यावेळी पौर्णिमा यांनी कंपनीविषयी सारी माहिती दिली. त्यावेळी दिलीप जोशी हा मुंबई परिसरासाठी काम पहात असल्याचे जलाल याने सांगितले. त्यानंतर पौर्णिमा यांनी पतीसह डिसेंबर २०१९ मध्ये जोशी याची मुंबईत भेट घेतली. त्यावेळी संशयित मंगेश गांगुर्डे हा भारतातील काम पाहत असल्याने त्यावेळी ओळख झाली. त्यानंतर फिर्यादी हे मजीद जलाल आणि कंपनीला भेट देण्यासाठी दुबईला गेले.

त्यावेळी कंपनीचा मालक मुहम्मद फारूक, बद्र अहमद हुसेन यांची ओळख झाली. माल निर्यातीसाठी पन्नास टक्के रक्कम आगाऊ व मालाचे कंटेनर ‘युएई’मध्ये मिळाल्याने उर्वरित रक्कम देण्याचा व्यवहार ठरला. त्यानुसार जानेवारी २०२१ मध्ये ऑर्डर मिळाली. त्यानुसार द्राक्षाचे चार आणि डाळिंबाचे तीन असे सात कंटेनर निर्यात केले.

हेही वाचा: कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे दोन फुटांनी उघडले

त्याची रक्कम एक कोटी ५७ लाख इतकी होते. त्यावेळी तीस टक्के रक्कम फिर्यादी यांना देण्यात आली. उर्वरित रक्कमेसाठी जलाल याच्याशी संपर्क केले. त्यावेळी त्याने चालढकलपणा करण्यास सुरूवात केली. फसवणूक झाल्याचे समोर आल्यानंतर विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद देण्यात आली. त्यानुसार दुबईतील कंपनीच्या दोघा मालकांसह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस अधिक तपास करत आहेत.

अनेकांच्या फसवणूकीचा संशय

"फिर्यादी पाटील यांनी फसवणूक झाल्याचे समोर आल्यानंतर कंपनीची सारी माहिती घेतली. त्यावेळी वेळोवेळी नवीन कंपनी तयार करून व्यापाऱ्यांची फसवणूक करण्यात आल्याचे समोर आले. तसेच मुंबईतील कार्यालयास भेट दिली असता तेथील कर्मचारी हा फसवणूकीच्या गुन्हा अटक असल्याचे समोर आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे."

loading image
go to top