Kolhapur : डाव्‍या कालव्याचे पाणी मे अखेर येणार ; मंत्री मुश्रीफ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हसन मुश्रीफ

डाव्‍या कालव्याचे पाणी मे अखेर येणार ; मंत्री मुश्रीफ

कागल : मे २०२२ पर्यंत काळम्मावाडी धरणाच्या डाव्या मुख्य कालव्याचे पाणी कागलच्या श्रीमंत जयसिंगराव घाटगे तलावात येणार असल्याची माहिती ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. त्यांनी कालव्याच्या कामासह तलाव परिसराची पाहणी केली.

मंत्री मुश्रीफ म्हणाले, ‘‘कालव्याचे काम एक नोव्हेंबरपासून सुरू झाले. ७६ किलोमीटर लांबीपैकी ३१ किलोमीटरचे काम पूर्ण आहे. ३२ ते ४८ किलोमीटरमधील बहुतांशी कामे पूर्ण आहेत. दिंडनेर्लीपासून पुढील भागातील शेतकऱ्यांची पाण्यासाठी आग्रही मागणी आहे. त्यामुळे ४८ पासून ६६ व्या किलोमीटरपर्यंत १८ किलोमीटरचे काम पूर्ण होणार आहे. विधानसभा निवडणुकीवेळी दिलेल्या वचनापैकी आंबेओहळ प्रकल्प, सुळकूड पूल, बस्तवडे पूल ही कामे पूर्ण झाली. सरसेनापती संताजी घोरपडे स्मारकाचे काम पूर्णत्वाच्या टप्प्यावर आहे. लिंगनूर-मुदाळ तिट्टा चौपदरीकरणाचे काम पूर्ण होत आहे. कागल-निढोरी व लिंगनूर-माद्याळ रस्त्यांच्या चौपदरीकरणाला मंजुरी मिळून कामे सुरू होतील.’’

या वेळी जिल्हा परिषद सदस्य युवराज पाटील, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता महेश सुर्वे, कार्यकारी अभियंता सौ. बदामे, माजी नगराध्यक्ष नवल बोते, यशवंत गुरव, प्रवीण काळवर आदी उपस्थित होते.

loading image
go to top