जमिनीवरील अतिक्रमणाचा वाद भडकला ; महिलेने पेटवून घेण्याचा केला प्रयत्न | Kolhapur | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जमिनीवरील अतिक्रमणाचा वाद भडकला ; महिलेने पेटवून घेण्याचा केला प्रयत्न

जमिनीवरील अतिक्रमणाचा वाद भडकला ; महिलेने पेटवून घेण्याचा केला प्रयत्न

हुपरी : येथील गट क्रमांक ९२५ / ८ अ या वादग्रस्त जमिनीवरील अतिक्रमणे(Encroachments) आज पोलीस बंदोबस्तात हटविताना जोरदार वादावादी झाली. यावेळी एका महिलेने अंगावर ज्वालाग्राही पदार्थ ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. पण पोलीसांनी वेळीच प्रसंगावधान दाखवल्याने अनर्थ टळला. दरम्यान, सहायक पोलिस निरीक्षक पंकज गिरी व अतिक्रमणधारक यांच्यात धक्काबुक्कीचा प्रकार घडला. त्यामुळे आंदोलनकर्त्यां दोन महिलांसह सहायक निरीक्षक पंकज गिरी यांना प्रकृती अस्वास्थ्याचा परिणाम जाणवू लागला. त्यामुळे सहायक निरीक्षक पंकज गिरी यांच्यासह दोन महिला आंदोलकांना उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे. (The woman tried to set it on fire for Land encroachment controversy erupted )

हेही वाचा: चाकूरमध्ये तीन दुकानांना लागली आग; ५१ लाखांचे नुकसान

दरम्यान, एका महिलेची प्रकृती अधिकच बिघडल्याने त्यांना पुढील उपचारासाठी सीपीआर रूग्णालयात दाखल केले आहे. या घटनेमुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले असून राज्य राखीव दलाच्या तुकडीसह पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. घटनास्थळी इचलकरंजी विभागाचे पोलीस उपअधीक्षक बी बी महामुनी यांनी तातडीने भेट दिली आहे. सरकारी कब्जातील जमिनीचा ताबा मिळावा अशी चर्मकार समाजातील लोकांची मागणी आहे. तर संबंधित जमिन आपल्या मालकीची असल्याचा दावा चर्मकार समाजातील दुसऱ्या एका गटाने केला आहे. त्यावरून गेले काही दिवस वाद निर्माण झाला आहे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Kolhapur
loading image
go to top