चाकूरमध्ये तीन दुकानांना लागली आग; ५१ लाखांचे नुकसान

व्यापाऱ्यांनी शेजारच्या घरातून पाणी आणून आग विझविण्याचा प्रयत्न केला होता.
latur
latursakal media

चाकूर : शहरातील बोथी रोड भागातील तीन दुकानांना आग(fire) लागून ५१ लाख रुपयांचे नुकसान झाल्याची घटना शुक्रवारी (ता.३१) मध्यरात्री साडे अकराच्या सुमारास घडली आहे. बोथीरोड भागात मन्मथ शंकर डुमणे यांचे न्यु सुरेखा मशिनरी अॅण्ड हार्डवेअर, बबन सोमवंशी यांचे सोमवंशी हार्डवेअर व ज्ञानेश्वर गाडेकर यांचे गाडेकर ट्रेडर्स असे दुकान आहेत, शुक्रवारी मध्यरात्री श्री. डुमणे यांच्या दुकानाला शाॅटसर्कीटमुळे आग लागल्याची माहिती शेजारच्या दुकानदारांना दिसली त्यांनी ही माहिती पोलीसांना दिल्यानंतर पोलीस निरीक्षक बालाजी मोहीते, नायब तहसीलदार डाॅ. रोहन काळे यांनी घटनास्थळी तातडीने भेट दिली. (burnt three shops in chakur latur )

latur
Vaishno Devi Stampede : 12 जणांच्या मृत्यूनंतर मोदींकडून मदतीची घोषणा

तहसीलदार डाॅ. शिवानंद बिडवे यांनी लातूर व अहमदपुर येथून आग्नीशामक दलाच्या गाडीला पाचारण केले. तत्पुर्वी व्यापाऱ्यांनी शेजारच्या घरातून पाणी आणून आग विझविण्याचा प्रयत्न केला होता. एक तासानंतर आग्नीशामक दलाच्या वाहनाने संपुर्ण आग आटोक्यात आणली. शनिवारी (ता.१) सकाळी नायब तहसीलदार बालाजी चितळे, तलाठी नवनाथ खंदाडे यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला यात श्री. डुमणे यांच्या दुकानातील शेतकऱ्यांच्या मोटारी, वायर, पेरणी यंत्राचे साहित्य, पाईप व इतर साहित्य असे तीस लाख रूपयाचे नुकसान झाले आहे, श्री. गाडेकर यांच्या दुकानातील तांदुळ, गहु, ज्वारी, सरकी पेंडची पोते व इतर साहित्य असे दहा लाख रूपयाचे नुकसान झाले आहे तर श्री. सोमवंशी यांच्या दुकानातील वेल्डींग मशिन, काथी बंडल, रेन पाईप असे हार्डवेअरचे साहित्य जळून अकरा लाख रूपयाचे नुकसान झाले असल्याचा पंचनामा करण्यात आला आहे. कोरोनामुळे व्यापार बंद असल्यामुळे दोन वर्षापासून व्यापारी कर्जात अडकले असताना आगीमुळे झालेल्या नुकसानीत व्यापारी अडचणीत आले आहेत. शासनाकडून मदत देण्याची मागणी व्यापाऱ्यांकडून करण्यात येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com