कोल्हापूर Z P ने दिव्यांगांसाठी निधी दिला, ग्रामपंचायतींनी अडवला

कोल्हापूर Z P ने दिव्यांगांसाठी निधी दिला, ग्रामपंचायतींनी अडवला
Updated on: 
Summary

कोरोना काळात रोजगार नसलेल्या दिव्यांगांना उसनवार करण्याची वेळ आली आहे.

कोल्हापूर: जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींना आर्थिक हातभार लाभावा, यासाठी जिल्हा परिषदेकडून १ कोटी २० लाख १५ हजारांचा निधी ग्रामपंचायतींना देण्यात आला; मात्र जिल्ह्यातील निम्म्याहून अधिक ग्रामपंचायतींनी हा निधी गावातील दिव्यांगांना वाटलेला नाही. परिणामी, कोरोना काळात रोजगार नसलेल्या दिव्यांगांना उसनवार करण्याची वेळ आली आहे.

कोल्हापूर Z P ने दिव्यांगांसाठी निधी दिला, ग्रामपंचायतींनी अडवला
कोल्हापूर: खोराटवाडी गावात घुसला टस्कर हत्ती

ग्रामीण भागात तसेच शहरात स्थानिक स्वराज्य संस्थांकडून विविध कर गोळा केले जातात. यातील पाच टक्के कर दिव्यांगांच्या उन्नतीसाठी खर्च करावा, असे आदेश राज्य शासनाने दिले आहेत. त्यानुसार जिल्हा परिषदेने ग्रामपंचायतींच्या खात्यावर वरील रक्कम टाकली आहे. संबंधित ग्रामपंचायतींनी त्या रकमेचे वर्गीकरण करून त्यांच्या गावातील दिव्यांगांना अनुदान म्हणून रक्कम वाटप करणे अपेक्षित आहे. यात गेल्या वर्षी ३५० रुपये दिले होते. यात वाढ करून यंदा ५०० रुपये रोख देण्यात येणार आहेत.

कोल्हापूर Z P ने दिव्यांगांसाठी निधी दिला, ग्रामपंचायतींनी अडवला
कोल्हापूर जिल्ह्यात निर्बंध 'जैसे थे'; वीकेंड लॉकडाउन कायम

काही ग्रामपंचायतींनी त्यांच्या गावातील दिव्यांगांना हा निधी रोखीने दिला; मात्र बहुसंख्य ग्रामपंचायतींनी हा निधी दिलेला नाही. गतवर्षी कोरोना सुरू झाला, मध्यंतरी दीर्घकाळ लॉकडाउन होते. या काळात अनेक व्यवसाय बंद होते. दिव्यांग विविध व्यवसाय करून उपजीविका करतात. त्यांना पैसे मिळणेही बंद झाले. ज्या दिव्यांगाचे अपंगत्व तीव्र आहे त्यांना घरच्या इतर व्यक्ती मदत करतात; मात्र कोरोना काळात रोजगार नाही, पैसे नाहीत, म्हणून दिव्यांग व्यक्तींच्या जगण्याच्या अडचणीत वाढ झाली आहे. ग्रामपंचायतीकडे सतत हेलपाटे मारणे दिव्यांगांना शक्य होत नाहीत. त्यांना तांत्रिक अडचणी सांगितल्या जात असल्याने दिव्यांगांना गप्प बसावे लागते. माहितीनुसार, ६० टक्केहून अधिक ग्रामपंचायतींकडून दिव्यांगांना अनुदान मिळालेले नाही.

कोल्हापूर Z P ने दिव्यांगांसाठी निधी दिला, ग्रामपंचायतींनी अडवला
मुख्यमंत्री कोल्हापूर विमानतळावर दाखल; सांगलीच्या दिशेने रवाना

‘‘जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाकडून दिव्यांग व्यक्तींसाठी अनुदानाची रक्कम ग्रामपंचायतींच्या खात्यावर जमा केली आहे. त्याचे वाटप करा, असे आदेशही दिले आहेत. त्यानुसार कार्यवाही होईल. आजवर किती ग्रामपंचायतींनी किती दिव्यांगांना लाभ दिला याची माहिती घेतली जात आहे. लवकरच संबंधित अधिकाऱ्यांची बैठकही होणार आहे.’’

- दीपक घाटे, समाजकल्याण अधिकारी, जिल्हा परिषद

‘‘दिव्यांगांना पाच टक्के दिव्यांग निधीमधून मिळणारी अनुदानाची रक्कम तातडीने द्यावी यासाठी संघटनात्मक पातळीवर पाठपुरावा केला आहे. जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाने ही रक्कम संबंधितांच्या खात्यावर टाकली आहे. असे असूनही त्याचा लाभ मिळणे अपेक्षित आहे ’’

- देवदत्त माने, जिल्हाध्यक्ष, प्रहार संघटना.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Kolhapur Drought, Six Talukas, District Bank Resolution
32-year-old Vikas Chougale drowned in Kasari River
Pune MLC Election, Graduate Teacher Seats,
Maharashtra sugar season
Marathi News Esakal
www.esakal.com