बेळगावात हनुमान मंदिर फोडून पावणेचार लाखाच्या मुद्देमालावर डल्ला  | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

theft of four lakh issues in belgaum hanuman temple

ग्रामीण भागासह शहर उपनगरात सातत्यान मंदिरे फोडण्यात येत असल्याने नागरिकामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे

बेळगावात हनुमान मंदिर फोडून पावणेचार लाखाच्या मुद्देमालावर डल्ला 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बेळगाव : हनुमाननगर येथील हनुमान मंदिर फोडून चोरट्यांनी चांदीची प्रभावळ, मुर्ती आणि पितळ्याचा गदा असा एकून 3 लाख 85 हजार रुपयांच्या मुद्देमालावर डल्ला मारला. गुरुवारी (ता.12) सकाळी 6.20 च्या सुमारास ही घटना उघडकीस आली. घटनेची नोंद एपीएमसी पोलिस ठाण्यात झाली आहे. ग्रामीण भागासह शहर उपनगरात सातत्यान मंदिरे फोडण्यात येत असल्याने नागरिकामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

बुधवारी (ता.11) मध्यरात्री चोरट्यांनी मंदिराच्या दर्शनी दरवाजाचे कुलुप तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर गाभाऱ्याचे कुलूप तोडून 3 लाख 20 हजार रुपये किमतीची आठ किलो वजनाची चांदीची प्रभावळ, साठ हजार रुपये किमतीची दिड किलो वजनाची चांदीची मुर्ती आणि पाच हजार रुपये किमतीचा पितळ्याचा गदा असा एकून 3 लाख 85 हजार रुपयांच्या मुद्देमालावर डल्ला मारुन पलायन केले. नेहमी प्रमाणे आज सकाळी 6.20 च्या सुमारास पुजारी मंदिराकडे आले असता घडला प्रकार त्यांच्या निदर्शनास आला. त्यांनी ही माहिती विश्‍वस्थ मंडळाला दिली.

हे पण वाचाही पदवीधरची निवडणूक आहे, आता माघार नाही ; डॉ. श्रीमंत कोकाटे

घटनेची माहिती समजताच एपीएमसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक जावेद मुशापुरी व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. घटनास्थळी श्‍वानपथक तसेच ठसेतज्ञांना देखील पाचारण करण्यात आले. घरफोडीच्या घटना सुरु असतानाच मंदिरे फोडीचे सत्र थांबलेले नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी तातडीने चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी करण्यात येत आहे.

संपादन - धनाजी सुर्वे 

loading image
go to top