तोतया पोलिसांचा दोघा वृद्धांना गंडा ; दोघे भामटे सीसीटीव्हीत कैद

Theft of Rs 50,000 in cash along with gold jewelery
Theft of Rs 50,000 in cash along with gold jewelery
Updated on

कोल्हापूर - पोलिस असल्याची बतावणी करून दोघा भामट्यांनी आज एकाच दिवशी वेगवेगळ्या ठिकाणी दोन वृद्धांना गंडा घातला. त्यांच्याकडील साडेतीन तोळे सोन्याच्या दागिन्यांसह ५० हजारांची रोकड गायब केली. देवकर पाणंद, नागाळा पार्क परिसरात भरदिवसा हा प्रकार घडला. जुना राजवाडा व शाहूपुरी पोलिस ठाण्यात याची नोंद आहे. 
 
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अरुण परीट संभाजीनगर परिसरात राहतात. ते सेवानिवृत्त असून आज सकाळी फिरायला गेले होते. देवकर पाणंद येथे दोघे जण त्यांच्याजवळ आले. दोघांनी त्यांना अडवून पोलिस असल्याचे सांगितले. पुढे तपासणी सुरू आहे; तुम्ही थांबला का नाहीत, अशी विचारणा केली. त्यानंतर परीट यांना खिशातून रुमाल काढण्यास सांगितला. पैशाचे पाकीट व अंगावरील दागिने काढून त्यात ठेवण्यास सांगितले. त्यानुसार परीट यांनी पैशाचे पाकीट व एक तोळ्याची सोन्याची अंगठी काढून त्या दोघांकडे दिली. त्या दोघांनी रुमालात फक्त पैशाचे पाकीट बांधून त्यांना परत दिले व ते सोन्याची अंगठी घेऊन तेथून पसार झाले. हा प्रकार परीट यांच्या लक्षात आला. त्यांनी याबाबतची फिर्याद जुना राजवाडा पोलिस ठाण्यात दिली. 

दरम्यान, भगवान चौगुले ताराबाई पार्क येथे राहतात. ते, सकाळी फेरफटका मारून मित्राला ५० हजार रुपये उसने देण्यासाठी घरातून बाहेर पडले. ते फिरून पितळी गणपती रिक्षा थांब्याच्या दिशेने पायी जात होते. त्याचवेळी त्यांनी मित्राला फोन केला; पण मित्र बाहेरगावी गेले असल्याने ते पैसे घेऊन पुन्हा घरी जात होते. दरम्यान, समोरून काळ्या मोटारसायकलवरून एक व्यक्ती त्यांच्या समोर आली. त्याने त्यांना ‘कुठे निघालाय, दोन दिवस झाले मी तुम्हाला हाक मारतोय, तुम्ही लक्ष देत नाही, पुढे स्मगलिंगचा माल सापडलाय, सर्व लोकांना तपासले जात आहे. तुमच्या पिशवीत काय आहे, ते दाखवा. मी पोलिस खात्यातील अधिकारी आहे.’ असे सांगितले. त्याचवेळी त्याचा साथीदार तेथून पायी जात होता. त्याला त्याने अडवून त्याला पिशवीत घड्याळ व पाकीट ठेवण्यास सांगून दम भरल्याचा देखावाही केला. त्यानंतर त्याने चौगुले यांच्या हातातील पिशवी तपासली. त्यातील ५० हजारांच्या नोटांचा बंडल त्याने काढून त्यातील छोट्या पाकीटात ठेवल्याचा बहाणा करत गळ्यातील दीड तोळ्याची सोन्याची चेन व एक तोळ्याची अंगठीही त्यात ठेवण्यासाठी काढून घेतली. चौगुले यांना ती पिशवी घरी जाऊन बघा, असेही सुनावले. त्यानंतर तो पायी जाणाऱ्या साथीदारासह मोटारसायकलवरून निघून गेला. घरी गेल्यानंतर चौगुले पिशवी तपासली. त्यावेळी त्यात रोकडसह दागिने नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी संबंधित दोघा भामट्यांविरोधात शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. 

हे पण वाचा - कोल्हापूरच्या वीरपुत्राला अखेरचा निरोप; 8 वर्षांच्या चिमुकल्याने दिला भडाग्नी
 
दोघे भामटे सीसीटीव्हीत कैद
एकाच दिवशी अर्धा तासात दोन वृद्धांना लुबाडणाऱ्या दोघा संशयित भामट्यांचा मिळालेल्या वर्णनानुसार पोलिसांनी शोध सुरू केला. दरम्यान, दोघेही भामटे परिसरातील सीसीटीव्हीत कैद झाले आहेत.

संपादन - धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com