Kolhapur : पर्यटनस्थळांच्या इतिहासाचे होणार संकलन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

shivaji university

पर्यटनस्थळांच्या इतिहासाचे होणार संकलन

sakal_logo
By
ओंकार धर्माधिकारी : सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : जिल्ह्यातील पर्यटनस्थळांचा इतिहास संकलीत करून त्यांची विविध भाषांतील पुस्तिका बनवणे तसेच या पर्यटनस्थळांच्या विकासासाठी योजना आखणे हा प्रकल्प शिवाजी विद्यापीठाला मिळाला आहे. या अंतर्गत किल्ले, धार्मिक स्थळे, ऐतिहासिक ठिकाणे, नैसर्गिक सौंदर्यस्थळे यांची माहिती संकलीत केली जाणार आहे. यासाठी विद्यापीठाने एक समिती बनवली असून शासनाने या प्रकल्पासाठी ५० हजारांचा निधीही मंजूर केला आहे.

जिल्ह्यातील पर्यटनाचा विकास करण्यासाठी व्यापक आराखडा बनवण्याचे काम सुरू आहे. यासाठी समाजातील विविध घटकांचे मार्गदर्शन घेतले जात आहे. त्याचबरोबर जिल्ह्यातील फारशी प्रसिद्ध नसलेले पर्यटनस्थळे प्रकाशात आणण्यासाठीही प्रयत्न सुरू आहेत. जी पर्यटनस्थळे प्रसिद्ध आहेत ती अधिक आकर्षकपणे देशभर पोहचवणे यासाठी विविध प्रकल्प सुरू केले आहेत. यातील एक प्रकल्प शिवाजी विद्यापीठाकडे सोपवला आहे. या अंतर्गत नवीन पर्यटनस्थळे शोधणे, त्यांची मार्गदर्शक पुस्तिका बनवणे, तिचे विविध भाषांत भाषांतर करणे. पर्यटनस्थळांजवळ माहिती फलक उभे करणे, अशी विविध कामे या प्रकल्पांतर्गत केली जाणार आहेत. यामुळे पर्यटन विकासाला गती मिळेल.

प्रकल्प अधिकारी असे

  1. प्रकल्प प्रमूख -डॉ.अविनाश पाटील (इतिहास अधिविभाग)

  2. प्रकल्प सहाय्यक - प्रा.डॉ.नंदकुमार मोरे (मराठी अधिविभाग)

  3. डॉ.नीलांबरी जगताप, (समन्वयक, छत्रपती शाहू महाराज मराठा इतिहास अध्ययन केंद्र)

  4. डॉ.मीना पोतदार (भूगोल अधिविभाग) व १० संशोधक विद्यार्थी

कोल्हापूरला ऐतिहासिक, धार्मिक वारसा लाभला आहे. निसर्गसौंदर्याने नटलेला परिसरही विपूल आहे. या प्रकल्पांतर्गत या सर्व ठिकाणांचा वास्तवदर्शी इतिहास संकलीत होणार आहे. त्यातून या पर्यटनस्थळांची समाजाला नव्याने ओळख होईल. देशोदेशीचे पर्यटन इथे हा इतिहास समजावून घेण्यासाठी येतील.

- डॉ.अवनिश पाटील, प्रकल्प अधिकारी.

loading image
go to top