कोल्हापूर : कधी वधू (Marriage) पक्षाकडून आल्याचा बनाव... कधी नवरदेवाचा नातेवाईक असल्याचा थाट... डोक्याला फेटा बांधून रुबाबात कार्यालयात वावर... अशा क्लृप्त्या वापरून दागिन्यांवर डल्ला मारणाऱ्या सराईताला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली. बाळासाहेब ऊर्फ अजित प्रकाश पाटील (वय २८, रा. आदमापूर, भुदरगड) असे त्याचे नाव आहे.