सावधान: पर्समधील दागिने चोरीचे वाढलेत प्रकार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

thief Three lakh rupees in eight Increased forms of jewelry theft in purses

आठ दिवसांत तीन लाखांवर रुपयांच्या ऐवजावर डल्ला, चोरट्यांचे गर्दीवर लक्ष 

सावधान: पर्समधील दागिने चोरीचे वाढलेत प्रकार

sakal_logo
By
राजेश मोरे

कोल्हापूर : गर्दीचा फायदा घेत महिलांची पर्स हातोहात लांबविण्याचे प्रकार वाढू लागलेत. सक्रिय झालेल्या चोरट्यांनी आठ दिवसात तीन लाखांवर रुपयांच्या ऐवजावर डल्ला मारला. 

सण, उत्सवासह दसरा दिवाळी सणावेळी होणाऱ्या गर्दीत भुरट्या चोऱ्या नव्या नाहीत. पण सोन्याचे दागिने, रोकड असा किमंती ऐवज असणारीच पर्स हेरून ती हातोहात लांबविण्याचा चोरट्यांचा प्रकार धक्कादायक आहे. महाद्वाररोडवर दिवाळीच्या खरेदीसाठी आलेल्या महिलांच्या हातातील पर्स लांबविण्याचे दोन प्रकार नुकतेच घडले. या परिसरातील दुकानातून महिलेची पर्स लांबवून चोरट्याने साडेचार तोळ्याचे सोन्याचे दागिने, २५ हजाराची रोकडसह ६०० ग्रॅम चांदीचे दागिने असा सुमारे पावणे दोन लाखांचा ऐवज लंपास केला. त्यानंतर दोन एक दिवसाच्या अंतरावर याच महाद्वाररोडवर खरेदीसाठी आलेल्या महिलेचा डोळा चुकवून सव्वा दोन तोळ्याचे सोन्याचे दागिने चोरट्याने लांबवले. त्यानंतर मध्यवर्ती बस स्थानक परिसरातून प्रवाशाची एक बॅगेवर डल्ला मारला. मात्र सुर्देवाने त्यात केवळ कागदपत्रेच होती. 


नवरात्रोत्सवात श्री अंबाबाई मंदिरात लाखो भाविक येतात. याठिकाणच्या भुरट्या चोऱ्या रोखण्यासाठी दरवर्षी पोलिस बंदोबस्त तैनात असतो. संशयितरित्या फिरणाऱ्या चोरट्यांवर कारवाई केली जाते. परिणामी दिवाळ सणातील गर्दीच्या ठिकाणच्या चोऱ्यांचे प्रमाण कमी होते. पण यावर्षी कोरोना संकाटामुळे नवरात्रोत्सव साधेपणाने साजरा झाला. परिणामी भुरट्या चोरट्यानी आता दिवाळ सणाच्या गर्दीचा फायदा उठविण्याकडे मोर्चा वळविला आहे. या चोरट्यांचा बंदोबस्त करा अशी मागणी होत आहे. 

 हे अपेक्षित...
  कारागृहातून बाहेर पडलेल्या चोरट्यांवर 
     लक्ष ठेवा
  गर्दीच्या ठिकाणी गस्त वाढवा
  सीसी टीव्हीची संख्या वाढवा
  रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर तपासा
  तक्रारीची वेळेत दखल घ्या

चोऱ्यांचे मार्च ते जुलै २०२० अखेर स्थिती  
महिना    दाखल    उघड
मार्च    ५६    १३
एप्रिल    १९    ०५
मे    ३८    ०७
जून    ६६    १८
जुलै    ५७    १६
संपादन - अर्चना बनगे

loading image
go to top