कोवाड ही तालुक्यातील मोठी बाजारपेठ आहे. गेल्या अनेक वर्षांपासून येथे सीसीटीव्हीचा प्रश्न घोंगावतो आहे. बाजारपेठेत दररोज कोट्यवधींची उलाढाल होते.
कोवाड : येथील स्टेट बॅंक ऑफ इंडियाचे (State Bank of India) एटीएम मशीन (ATM Machine) चोरट्यांनी शनिवारी (ता. ४) रात्री सव्वा बाराच्या सुमारास गॅस कटरने फोडून त्यातील १८ लाख ७७ हजार ३०० रुपयांची रोकड पळवली. घटनेची माहिती मिळताच चंदगड पोलिसांनी (Chandgad Police) सर्वत्र नाकाबंदी केली. पळून जाणाऱ्या चोरट्यांच्या भरधाव मोटारीने नेसरी येथे पोलिसांनी रस्त्यावर लावलेले बॅरिकेड उडवून लावले. नेसरी पोलिसांनी (Nesari Police) जीव धोक्यात घालून चोरट्यांचा थरारक पाठलाग केला.